संभलमध्ये सापडलेल्या मंदिराजवळची अनधिकृत घरे लोक स्वतःच का पाडतायत?

संभलच्या दीपा सराईमध्ये ४६ वर्षांनंतर सापडले हिंदू मंदिर

संभलमध्ये सापडलेल्या मंदिराजवळची अनधिकृत घरे लोक स्वतःच का पाडतायत?

उत्तर प्रदेशमधील संभल येथे हिंदू मंदिर सापडले असून या मंदिराचे दरवाजे ४६ वर्षांनंतर उघडण्यात आले. यानंतर मंगळवारी मंदिराच्या मागे असलेल्या घराचे बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याला सुरुवात झाली. मंदिराशेजारी बेकायदा बांधकाम करण्यात आले होते त्यामुळे आता ते पाडले असल्याचे जमीन मालक मतीन यांनी सांगितले. त्यांच्याकडे याचा नकाशा नसल्याने त्यांनी हे अनधिकृत बांधकाम तोडल्याचे म्हटले. यानंतर आता या परिसरातील इतर रहिवाशांनी अतिक्रमण करून केलेलं बांधकाम स्वतः पाडण्यास सुरुवात केली आहे.

संभलच्या दीपा सराईमध्ये ४६ वर्षांनंतर हिंदू मंदिर सापडले. यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले असून सुरक्षाही तैनात करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून, सर्वसमावेशक अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केली आहे. मंदिराशेजारी असलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केल्यानंतर आता या मंदिराजवळ राहणाऱ्या लोकांना त्यांची अनधिकृत घरे पाडली जाण्याची भीती व्यक्त केली आहे. या भीतीपोटी लोकांनी स्वतःहून आपली अनधिकृत घरे पाडण्यास सुरुवात केली आहे. मंदिराजवळ लोकांनी अतिक्रमण करून घरे बांधली होती. मात्र, प्रशासनाकडून कारवाई होण्यापूर्वी येथील लोकांनी स्वतःची घरे स्वताःच पाडण्याला पसंती दिली आहे.

मंदिराजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, जर आम्ही आमची घरे स्वतः पाडली तर किमान आमच्या काही मौल्यवान वस्तू आम्हाला वाचवता येतील. पाडण्याचे काम प्रशासनावर सोडले तर कदाचित आमच्या हाती काहीच उरणार नाही.

हे ही वाचा : 

सौदी अरेबियाच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानने त्यांच्याकडील ४,३०० भिकाऱ्यांना टाकले नो फ्लाय लिस्टमध्ये

वीज चोरीच्या मुद्द्यावर संभलमध्ये सपा खासदाराच्या घरी ‘स्मार्ट मीटर’

दुसऱ्या दिवशी सभागृहात आलेले उद्धव म्हणाले, मोदीही सभागृहात येत नाहीत!

रणजितसिंह मोहिते पाटलांवर होणार कारवाई?, भाजपाने शिस्तभंगाची पाठीविली नोटीस

संभल भागात वीजचोरी रोखण्यासाठी आलेल्या पोलीस आणि प्रशासनाच्या पथकाला १९७८ पासून बंद असलेले मंदिर निदर्शनास आले. यानंतर या मंदिरात विधी आणि मंत्रोच्चार करून पूजा आरती करण्यात आली. हे कार्तिक महादेवाचे मंदिर असल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र पेनसिया यांनी दिली. येथे एक विहीर सापडली आहे. या विहिरीतून काही मूर्ती सापडल्या आहेत. मंदिर सापडल्यानंतर येथे २४ तास सुरक्षेसाठी एक पथक तैनात करण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. यानंतर येथील अतिक्रमण काढण्यात येत आहे. संभलच्या जिल्हा प्रशासनाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) भस्म शंकर मंदिर, शिवलिंग आणि तेथे सापडलेल्या विहिरीच्या कार्बन डेटिंगसाठी पत्र लिहिले आहे.

Exit mobile version