एकीकडे देशभरात हिजाबवरून वादंग माजलेला असताना आंध्र प्रदेशमध्ये मात्र दोन मुलींना दबावाखाली येऊन बुरख्यात कॉलेजातील वर्गात बसण्याची मुभा कॉलेज प्रशासनाने दिली.
आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथील लोयोला कॉलेजच्या नियमानुसार गणवेश घालून येणे बंधनकारक आहे. पण दोन मुली चक्क बुरख्यात कॉलेजमध्ये आल्या आणि त्यांना वर्गातही बुरखा घालूनच बसायचे होते. कॉलेजच्या प्राचार्यांनी त्याला विरोध केला. वर्गातील मुली आणि शिक्षक मुस्लीम वेशात वर्गात येऊ शकत नाहीत, असा इशारा देण्यात आला.
सादिकुन्निसा पठाण आणि रेश्मा शेख या बीएससी दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनी असून त्या गुरुवारी बुरखा घालूनच कॉलेजमध्ये आल्या आणि वर्गातही बुरख्यात बसण्याची मागणी करू लागल्या. त्यांनी अशी तक्रार केली की, आम्ही हिजाबमध्ये कॉलेजात आलो तेव्हा आम्हाला कॉलेज प्रशासनाने प्रवेश करू दिला नाही. आम्ही अगदी सुरुवातीपासून हिजाब परिधान करत होतो पण आता आम्ही हिजाब घालून कॉलेजात येऊ शकत नाही.
हे ही वाचा:
पेटीएम, नायका, पीबी आणि झोमॅटो गुंतवणूकदार बुडाले
‘गुरुनानक देवजींची तपोभूमी लाहोर भारतात नाही, हे काँग्रेसने केलेले पाप’
चिंचपोकळीची पानसरे इमारत कोसळायला आली तरी आमदार निधीतून विटांचे बांधकाम
पण या मुलींच्या आयडी कार्डवर या मुलींचे हिजाबसह फोटो आहेत. बुरख्यासह नाहीत. मात्र कॉलेजमध्ये येताना या मुली मात्र बुरख्यात आल्या होत्या. कॉलेजचे प्राचार्य जीएपी किशोर म्हणाले की, जेव्हा मी सकाळी कॉलेजमध्ये देखरेखीसाठी फेरफटका मारत होतो तेव्हा तीन मुली कॉलेजमध्ये प्रवेश करताना पाहिल्या. त्यातील दोन मुली बुरख्यात होत्या. जेव्हा त्यांना मुलींच्या प्रतीक्षा खोलीत बुरखा काढून मगच वर्गात जाण्यास सांगितले तेव्हा त्यांनी असे करण्यास नकार दिला.
Two students of Loyola College, Vijayawada in Andhra Pradesh are disallowed from attending classes in burqa. The college authorities have said hijab is allowed in classes but not burqa. A protest is underway. @TheQuint pic.twitter.com/QVeG3W3qra
— Nikhila Henry (@NikhilaHenry) February 17, 2022
मात्र नंतर प्राचार्यांनी त्या मुलींना दबावाखाली येत वर्गात बसू दिले. हिजाबच्या मुद्द्यावरून सध्या देशभरात वातावरण जाणीवपूर्वक तापवले जात आहे. कर्नाटक उच्च न्यायालयात आता याचसंदर्भात सुनावणी सुरू आहे.