उत्तर प्रदेशमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दोन पाकिस्तानी समर्थक मुस्लिम तरुण पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
मध्य प्रदेशमधील बरेलीच्या सिंघाई मुतावन गावात ही घटना घडली आहे. मुस्तकीम आणि नईम हे दोघे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत होते. तसेच हे दोघे त्यांच्या मोबाईलवर दुकानात गाणी वाजवत होते. हिंदुत्ववादी नेते हिमांशू पटेल आणि आशिष पटेल तेथून जात असताना त्यांनी हे पहिले. त्यावेळी त्यांनी त्या दोघांना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्याबद्दल जाब विचारला. त्यावेळी मुस्तकीम आणि नईम यांनी या हिंदुत्ववादी नेत्यांना धमकी दिली. धमकावत ते म्हणाले, आम्हाला हवे ते आम्ही करू, तुम्हाला जिकडे तक्रार करायची आहे तिकडे करा आणि गाण्याचा आवाज वाढवला.
आशिष पटेल यांनी मुस्तकीमच्या या धमकीचा व्हिडीओही बनवला असून त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनीही दखल घेत दोघांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून व्हिडिओची चौकशी सुरू आहे. गावातील लोकही मुस्तकीम आणि नईम यांच्यावर प्रचंड संतापले असून ते त्यांच्यावर गावातील वातावरण बिघडवल्याचा आरोप करत आहेत.
हे ही वाचा:
कर्करोगग्रस्त रुग्णांचा कुटुंबीयांसाठी ‘बाबू आर.एन. सिंह अतिथीगृह’
‘हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीला कुठे लपवले हे मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगावे’
गुणरत्न सदावर्तेंना ४ दिवसांची पोलीस कोठडी
रामनवमीच्या दिवशी मुश्रीफ जन्माला आले हे खोटे!
याआधीही मध्य प्रदेशात अशा घोषणा देऊन हिंदूंना भडकवण्याचे प्रयत्न झाले आहेत. मार्चमध्ये डुमरियागंज विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टीचे उमेदवार सय्यदा खातून यांचा विजय झाल्यानंतर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याची बाब समोर आली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देखील पोलिसांनी कारवाई केली होती.