फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डरमानिन यांनी गुरुवारी ट्युनिशियन मुस्लिम धर्मगुरू इमाम महजौब महजौबी यांना एका सामाजिक कार्यक्रमात फ्रान्सच्या राष्ट्रध्वजावर केलेल्या टिप्पणीबद्दल देशातून हद्दपार करण्याची घोषणा केली.
एक ट्युनिशियन मुस्लिम धर्मगुरू इमाम महजौब महजौबी यांनी फ्रेंच राष्ट्रध्वजावर अस्वीकारार्ह टिप्पण्या केल्यामुळे फ्रान्समधून हद्दपार करण्यात आले, अशी घोषणा फ्रान्सचे गृहमंत्री, गेराल्ड डरमानिन यांनी गुरुवारी केली.
गृहमंत्री दरमानिन यांनी सोशल मीडियावर या संदर्भातील निवेदन शेअर केले आहे. कट्टरवादी इमाम महजौब महजौबी यांना अटक केल्यानंतर १२ तासांच्या आत देशाच्या सीमेबाहेर हद्दपार करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या लोकांची गय केली जाणार नाही,’ असे त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे. महजौबी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिताना फ्रान्सचा राष्ट्रध्वज सैतानी असल्याचे म्हटले होते. मात्र बाग्नोल्स-सर-सीझ येथील एट्टौबा मशिदीतील हे इमाम आपल्या विधानावर ठाम आहेत. त्यांनी दावा केला की, त्यांचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि फ्रेंच ध्वजाचा अनादर करण्याचा त्यांचा कधीही हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
दंगलीत नुकसान करणाऱ्या बदमाशांकडून वसुलीसाठी कायदा!
विमान जमिनीवर उतरताना पायलटच्या डोळ्यांत शिरली लेझर किरणे
‘मोदीजींनी घरात भांडण लावून दिले, असे तर होणार नाही ना?’
वडेट्टीवारांनी केले जरांगेंच्या भाजपा प्रवेशाचे सुतोवाच…
या हद्दपारीच्या निर्णयाविरोधात त्यांचा वकील अपील करणार आहे. फ्रेंच मीडियाने हकालपट्टीच्या आदेशाचे काही भाग उघड केले, ज्यात महजौबीवर ‘इस्लामच्या शाब्दिक, मागास, असहिष्णु आणि हिंसक संकल्पनेचा प्रचार केल्याचा आरोप आहे. ही विचारधारा, प्रजासत्ताक मूल्यांच्या विरुद्ध असणाऱ्या वर्तनाला उत्तेजन देऊ शकते, ज्यात महिलांविरुद्ध भेदभाव, ओळख काढून घेणे, ज्यू समुदायासोबत तणाव आणि जिहादी कट्टरतावादाला प्रोत्साहन देणे यांचा समावेश आहे. मुस्लीम धर्मगुरूला गुरुवारी संध्याकाळी ट्युनिसला जाणाऱ्या विमानात बसवण्यात आले होते, अशी माहिती रॉयटर्सने दिली.