ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे विद्यार्थिनीवर अत्याचार….त्यातून संपवले जीवन

ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे विद्यार्थिनीवर अत्याचार….त्यातून संपवले जीवन

तामिळनाडूतील तंजावर येथील सेक्रेड हार्ट हायर सेकेंडरी स्कूलमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका विद्यार्थिनीने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने तिच्या शाळेच्या अधिकाऱ्यांनी तिच्यावर अत्याचार केल्यामुळे तिने आत्महत्या केली आहे.

लावण्या गेल्या पाच वर्षांपासून तिच्या शाळेजवळील सेंट मायकल गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहत होती. ती १२वी च्या वर्गात शिकत होती. सरकारी अनुदानित ख्रिश्चन मिशनरी स्कूल तिच्यावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकत होते. मात्र, लावण्या आपला धर्म न सोडण्यावर ठाम होती आणि तिने धर्मांतर करण्यास नकार दिला. लावण्याच्या प्रतिकारामुळे संतप्त झालेल्या शाळा प्रशासनाने पोंगल उत्सवासाठीचा तिचा रजेचा अर्ज रद्द केला. तिला शाळेतील स्वच्छतागृहे साफ करणे, स्वयंपाक करणे, भांडी धुणे अशी कामे करण्यास भाग पाडले जात असे. यामुळे हताश झालेल्या लावण्याने शाळेच्या बागेत वापरण्यात आलेले कीटकनाशक प्राशन करून जीवन संपवले.

९ जानेवारीला रात्री लावण्यला अस्वस्थतेची लक्षणे दिसू लागली, तिला सतत उलट्या होत असताना स्थानिक दवाखान्यात नेण्यात आले. वसतिगृहाच्या वॉर्डनने तिच्या पालकांना बोलावून तिला घरी नेण्यास सांगितले. त्यानंतर लावण्यला तंजावूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची जवळपास ८५ टक्के फुफ्फुसे बाधित असल्याने तिच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू होते. हॉस्पिटलमध्ये प्रकृतीशी झुंज देत लावण्याने १९ जानेवारी रोजी अखेरचा श्वास घेतला.

हे ही वाचा:

अनोखे लग्न..गुगलमीटवरून नातेवाईकांची उपस्थिती आणि झोमॅटोवरून जेवण

‘माझी शिफ्ट संपली’…ऐन प्रवासा दरम्यानच पाकिस्तानी वैमानिकाचा विमान चालवायला नकार

इंडिया गेटवर नेताजींचा भव्य पुतळा….पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

विनयभंग करून पैसे हिसकावून नेणाऱ्याला चोराला २४ तासांतच अटक

 

लावण्यने मदतीसाठी हाक मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये ती बेशुद्ध अवस्थेत तिच्या अत्याचाराविषयी बोलताना दिसत आहे. लावण्याच्या नातेवाईकांनी १७ जानेवारी रोजी तिरुकट्टुपल्ली पोलिस ठाण्यात जाऊन शाळेवर कारवाई करण्याची मागणी करत निदर्शने केली. वसतिगृहातील वॉर्डन सगायमरीने तिला धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडले म्हणून लावण्यने कीटकनाशके प्राशन केल्याचा आरोप त्यांनी केला.

या घटनेची दखल घेत विश्व हिंदू परिषद, हिंदू मुन्नानी आणि राजकीय संघटना इंदू मक्कल काची या हिंदू संघटनांनी लावण्यला न्याय मिळावा आणि हिंदूंच्या हिंसक धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवला आहे.

Exit mobile version