टिपू सुलतान हा स्वातंत्र्ययोद्धा असल्याची प्रतिमा गेली अनेक वर्षे रंगविण्यात आली आहे. मात्र त्याच्या अत्याचारांच्या कथाही समोर आलेल्या आहेत. आता त्याच्या या अत्याचारांवरच आधारिता टिपू नावाची फिल्म येते आहे. इरॉस इंटरनॅशनलने टिपूवरील ही फिल्म आणली आहे.
यासंदर्भातील एक व्हीडिओ व्हायरल होत असून त्यात काही गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत, ज्यातून टिपू सुलतानच्या अत्याचारी प्रवृत्तीची माहिती देण्यात आली आहे. टिपू सुलतानने ८ हजार देवळे उद्ध्वस्त केली. २७ चर्च त्याने जमीनदोस्त केली. ४० लाख हिंदूंना त्याने इस्लाम धर्मात आणले तसेच त्यांना गोमांस खाण्यास प्रवृत्त केले. एक लाख हिंदूंना त्याने बंदी बनवले. कालिकतमधून त्याने २ हजार ब्राह्मण कुटुंबांना नाहिसे केले. १७८३मध्ये त्याने जिहादची घोषणा केली.
५० सेकंदांच्या या व्हीडिओत जळणारी देवळे पार्श्वभूमीवर दिसत आहेत आणि त्यावर मग टिपूकडून झालेल्या अत्याचाराची आकडेवारी दिसते. नंतर टिपूचा चेहरा येतो आणि त्यावर नंतर काळे फासले जाते.
रश्मी शर्मा आणि संदीप सिंग यांचा हा चित्रपट आहे. पवन शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. संदीप सिंग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चित्रपट केला आहे. रणदीप हूडा हा या चित्रपटातील मुख्य कलाकार आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरील अटल हा आत्मकथनपर चित्रपटही त्यांनी केलेला आहे. त्यात पंकज त्रिपाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ शिक्षकांचा मृत्यू
सुदानमधून ३,८०० भारतीय सुखरूप मायदेशी परतले
मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
इम्रान खान यांना धक्काबुक्की, पुन्हा पायाला दुखापत
टिपू हा चित्रपट हिंदी, कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम या भाषांमध्ये येत आहे. यासंदर्भात दिग्दर्शक पवन शर्मा म्हणाले की, जे काही टिपू सुलतानबाबत शाळांमध्ये शिकवले गेले ती अत्यंत चुकीची माहिती होती. पण जेव्हा मला अस्सल माहिती मिळाली तेव्हा धक्का बसला. त्याला योद्धा ठरविण्याचा जो प्रयत्न करण्यात आला, त्याचे वास्तव दाखविण्याचा मी प्रयत्न केला.
या चित्रपटाविषयीचे संशोधन रजत सेठी यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, टिपू सुलतानचे कौतुक अति करण्यात आले. त्याने केलेल्या अत्याचारांना दाबून ठेवण्यात आले.