तृणमूल काँग्रेस आमदाराने राम मंदिराबद्दल ओकली गरळ; अपवित्र स्थान म्हणत हिणवले

बंगाल भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी नोंदवणार तक्रार

तृणमूल काँग्रेस आमदाराने राम मंदिराबद्दल ओकली गरळ; अपवित्र स्थान म्हणत हिणवले

तृणमूल काँग्रेस आमदाराने राम मंदिराबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. तारकेश्वर येथील तृणमूलचे आमदार रामेंदू सिन्हा यांनी त्यांच्या भाषणावेळी राम मंदिराबद्दल गरळ ओकल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यांनी राम मंदिराला अपवित्र स्थान म्हणत हिंदुनी पूजेसाठी राम मंदिरात जाऊ नये, असही म्हटलं आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला असून रामेंदू सिन्हा यांच्या वक्तव्यावरून विरोधी नेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

बंगाल भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी रामेंदू सिन्हा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “तृणमुल काँग्रेसच्या नेत्यांचे खरे रूप हेच आहे. हिंदूंवर आक्रमण करण्याची त्यांची हिंमत इतकी वाढली आहे की, आता ते भगवान श्री राम यांच्या भव्य मंदिराला अपवित्र ठरवत आहेत. तारकेश्वरचे आमदार रामेंदु सिन्हा रॉय यांनी भव्य राम मंदिराला अपवित्र ठरवलं असून कुठल्याही भारतीय हिंदूने अशा अपवित्र स्थळाची पूजा करु नये, असं त्यांनी म्हटलंय. त्यांच्या या अपमानास्पद वक्तव्याचा फक्त निषेधच करत नाही, तर जगभरातील हिंदुंच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवणार आहे,” अशी घाणाघाती टीका सुवेंदू अधिकारी यांनी केली आहे.

हे ही वाचा:

स्वतःच्या जुळ्या मुलांना पाहण्याआधी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी धाव

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवू शकणार

विभागीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत आलोक, दुर्वाला सुवर्ण

भाजपाने चंदीगड उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली

तृणमूलचे आमदार रामेंदू सिन्हा हे त्यांच्या भाषणात म्हणाले की, एक मंदिर बनले आहे. राम मंदिर. मी हा सल्ला देतो की हिंदुस्तानमधील हिंदूंनी या अपवित्र राम मंदिरात पूजा करण्यासाठी जाऊ नये. हे मंदिर केवळ दिखाव्यासाठी बांधण्यात आले आहे,” अशा आशयाचे वक्तव्य तृणमूल काँग्रेस आमदार रामेंदू सिन्हा यांनी केलं आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Exit mobile version