राज्यात माघी गणेशोत्सवाचा आनंद

गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

राज्यात माघी गणेशोत्सवाचा आनंद

आज माघी गणेशोत्सव. अर्थात गणेश जयंती. माघी महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला श्री गणेशाचा जन्म झाला. हा दिवस माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी त्यांची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते, असे म्हणतात.

गणेश जयंती निमित्त अनेक जण भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणे गणेश मूर्ती घरी आणतात किंवा मंडपात मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. त्याच उत्साहाने गणेशाची मूर्ती वाजत गाजत आणली जाते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यानिमित्त उत्साह दिसून येत आहे.

श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे. या दिवशी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी व्रत पाळतात आणि पूजा करताना गणपती स्तोत्राचे पठण करतात.

उदयतिथीनुसार, मंगळवार, १३ फेब्रुवारी २०२४ रोजी माघी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कोकणच्या किनारी भागात साजरा करतात.

ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार गणेश जयंती जानेवारी/फेब्रुवारी महिन्यात येते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढेच महत्त्व आहे. या गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी असेही म्हटले जाते.

गणेशाच्या या सणाला उत्तर प्रदेशात तिलो चौथ किंवा सकट चौथी असेही म्हणतात, जेथे कुटुंबातील मुलाच्या वतीने गणेशाचे आवाहन केले जाते. याला महाराष्ट्रात तिलकुंड चतुर्थी असेही म्हणतात.

हे ही वाचा:

राष्ट्रीय लोक दलाचा ‘इंडी’ला रामराम; ‘एनडीए’ला देणार साथ

माकड टोपी गँगला अटक; घाटकोपरमधील एका ज्वेलर्सला करणार होते लक्ष्य

अशोक चव्हाणांनी मविआचा कार्यक्रम केला

हल्द्वानी हिंसाचाराप्रकरणी ३० जणांना अटक

 

गणेश जयंतीच्या निमित्ताने अनेक आख्यायिका आहेत. त्यातील एक म्हणजे या दिवशी चंद्राला पाहत नाहीत. अन्यथा चोरीचा आळ येतो. अशीच एक कथा म्हणजे नंदीने सनतकुमार ऋषींना सांगितलेली एक आख्यायिका म्हणून, भगवान कृष्णावर श्यामंतक नावाचे एक मौल्यवान रत्न चोरल्याचा आरोप होता, कारण त्याने भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चंद्र पाहिला – जो निषिद्ध होता. देवऋषी नारदांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी माघ शुक्ल चतुर्थी किंवा गणेश जयंतीचे व्रत पाळले आणि चोरीच्या आरोपातून सुटका झाली.

Exit mobile version