यंदाचा कुंभमेळा साडे तीन ऐवजी फक्त दीड महिन्यांचा!

यंदाचा कुंभमेळा साडे तीन ऐवजी फक्त दीड महिन्यांचा!

हरिद्वारमध्ये फेब्रुवारी पासून सुरु होणारा कुंभमेळा हा फक्त ४८ दिवसांचा असणार आहे. राज्यातील कोविड नियमावलीचा विचार करून उत्तराखंड सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साडे तीन महिने चालणारा कुंभ मेळा फक्त दीड महिनेच चालणार आहे.

 

याविषयीची माहिती देताना उत्तराखंडचे नगर विकास मंत्री मदन कौशिक म्हणाले, “यावर्षी उत्तराखंड सरकारतर्फे  कुंभमेळ्याचे परिपत्रक १ जानेवारी ऐवजी फेब्रुवारी महिन्यात काढण्यात येईल. कोविड परिस्थिती पाहता मुख्य स्नानाची व्यवस्था मार्च-एप्रिल महिन्यात असेल, तर शाही स्नानाच लाभ भाविक ४८ दिवसात कधीही घेऊ शकतात.”

 

उत्तराखंड सरकारने कुंभ मेळ्यासाठी विशेष निधीची तरतूद केली आहे. निगराणी व्यवस्थेसाठी १७.३४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भाविकांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचाही विचार होत आहे. यासंबंधीचा प्रस्ताव मोरादाबाद रेल्वे डिव्हिजनने रेल्वे बोर्डाला पाठवला आहे.

Exit mobile version