यंदा राखी खरेदीसाठी बहिणींना मोजावे लागणार ज्यादा पैसे

यंदा राखी खरेदीसाठी बहिणींना मोजावे लागणार ज्यादा पैसे

भारतीय धार्मिक संस्कृतीनुसार श्रावणातील पहिल्या पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो. अवघ्या काही दिवसांवर रक्षाबंधन सण येऊन ठेपला आहे. बाजार राख्यांनी सजलेला पाहायला मिळतो. यंदा राख्यांची किंमत ४० टक्क्यांनी वाढली असल्यामुळे बहिणींना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

मुंबईतील घाऊक बाजारपेठ असलेल्या भुलेश्वर, मशीद बंदर आणि सायन येथे तयार झालेल्या राख्या मुंबई, ठाण्यासह उपनगरात विक्रीसाठी उपलब्ध असतात. यंदा राखी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यामध्ये वाढ झाल्याने, प्रत्येक राखी मागे ४० टक्क्यांनी भाव वाढ झाल्याची माहिती राखी विक्रेत्यांकडून देण्यात आली आहे. मागील वर्षी १० रुपये पासून १५०  रुपयांपर्यंत राख्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या. यंदा २० रुपये पासून २०० रुपयांपर्यंत राख्या विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत.

हे ही वाचा:

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून सत्तेची मलई ओरपलीत तेव्हा कुठे होता मराठी बाणा?

राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही

पंतप्रधानांच्या रॅलीत गोंधळ घालण्याच्या कटाप्रकरणी एनआयएचे दोन एफआयआर

तटरक्षक दलाने समुद्राखाली फडकवला तिरंगा

तसेच लहान मुलांसाठी कार्टून्स असलेली राखी बाजारात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे कूल भाई, स्वॅगवाला भाई, प्यारा भाई, चिलवाला भाई अशा नावाचे डिजाईन पेंडन्टच्या राख्या उपलब्ध आहेत. यासह ग्राहकांना स्टोन, कुंदन वर्क, कलर्ड बीड्स, घुंगरु, लाख, मिरर वर्क केलेल्या ग्राहकांसाठी आकर्षित राख्या बाजारात उपलब्ध आहेत. ठाण्यात बाजारपेठांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे छायाचित्र व संदेश असलेल्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. या राख्या बाजारात ४० ते १०० रुपयांपर्यंत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती ठाण्यातील राखी विक्रेते विनोद पवार ह्यांनी दिली.

Exit mobile version