‘ही तर पवित्र स्वप्नाची परिपूर्ती’

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेबाबत लालकृष्ण अडवाणी यांच्या भावना

‘ही तर पवित्र स्वप्नाची परिपूर्ती’

अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होणे ही पवित्र स्वप्नाची परिपूर्ती आहे, अशा भावना माजी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केल्या आहेत. अडवाणी यांनी राम मंदिरावर लिहिलेल्या लेखात हे वक्तव्य केले आहे. हा लेख ‘राष्ट्रधर्म’ या हिंदी मासिकात प्रसिद्ध होणार आहे.

या लेखाचे नाव ‘राम मंदिराची निर्मिती- पवित्र स्वप्नाची परिपूर्ती’ असे आहे. मासिकाच्या या विशेष अंकाची १६ जानेवारी रोजी छपाई होणार असून उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना त्याची प्रत दिली जाणार आहे. मासिकाच्या संपादकाशी अडवाणी यांनी यावेळी बातचीत केली. ‘रथयात्रा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी मला समजले की, मी केवळ सारथी आहे. रथयात्रेचा मुख्य दूत हा स्वतः रथ होता आणि तो पूजेसाठी योग्य होता, कारण तो मंदिर बांधण्याचा पवित्र उद्देश पूर्ण करण्यासाठी श्री राम जन्मभूमी अयोध्येला जात होता,’ असे अडवाणी म्हणाले.

हे ही वाचा:

वर्षभरात अयोध्येत ३१ कोटी पर्यटक, प्राणप्रतिष्ठेनंतर महापूर!

‘न्यायालयाचा आदेश सहन करू शकत नाही’… मुलाची हत्या करणाऱ्या सूचना सेठचे पत्र

जय श्रीराम: रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बोलावणार हुतात्मा कारसेवकांच्या कुटुंबियांना

स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिवस…विचारांचा जागर

अडवाणी हे २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेच्या एका नेत्याने दिली आहे. राम जन्मभूमीची चळवळ पसरवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यातील एक असणारे ९६ वर्षीय लालकृष्ण अडवाणी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहणार असल्याने ही बाब महत्त्वाची मानली जात आहे.

Exit mobile version