‘कब्रस्तान नव्हे, हे महाभारतकालीन लाक्षागृह’

५३ वर्षांनंतर आलेल्या न्यायालयाच्या निकालात हिंदू पक्षाचा विजय

‘कब्रस्तान नव्हे, हे महाभारतकालीन लाक्षागृह’

उत्तर प्रदेशातील बागपत येथील लाक्षागृह आणि कब्रस्तान वादावर न्यायालयाचा निर्णय हिंदू पक्षाच्या बाजूने लागला आहे. न्यायालयाने हे मान्य केले आहे की, ती जागा कब्रस्तान नव्हे तर महाभारतकालीन लाक्षागृहाची आहे. वादग्रस्त जमीन लाक्षागृहच आहे. लाक्षागृहाचे वर्णन महाभारतामध्ये करण्यात आले आहे. पांडवांना जिवंत जाळून मारण्यासाठी लाक्षागृहाची निर्मिती करण्यात आली होती.

ही जमीन कब्रस्तानची असल्याचा दावा करून मुकीम खान आणि अन्य व्यक्तींनी सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. सन १९७०पासून याबाबत खटला सुरू होता. सन १९९७मध्ये हा खटला बागपत येथे हस्तांतरित झाला. ५३ वर्षांनंतर हिंदूंच्या पक्षाच्या बाजूने निर्णय आला आहे. इथे कब्रस्तान नव्हे तर लाक्षागृह आहे आणि ते महाभारत काळापासून आहे, असे न्यायालयाने सांगितल्याचे हिंदू पक्षाच्या वकिलांकडून सांगण्यात आले. त्या ठिकाणी ज्या प्राचीन खुणा आढळल्या आहेत, त्यावरून हे स्पष्टच दिसते की, ते कब्रस्तान नाही, असे न्यायालयाने नमूद केल्याचा दावा हिंदू पक्षाच्या वकिलांनी केला.

हे ही वाचा:

औरंगजेबाने तोडले होते कृष्णजन्मभूमी मंदिर!

अमेरिकेत भारतीय स्थलांतरितांसाठी ग्रीन कार्डचा मार्ग खुला होणार

मुस्लिम धर्मगुरु अटक प्रकरणी शंभरपेक्षा जास्त जणांविरुद्ध गुन्हा

मुलुंडमध्ये भरदिवसा रस्त्यात डिलिव्हरी बॉयची हत्या

जेव्हा मुघल आले आणि जेव्हा त्यांनी येथे राज्य केले. तेव्हा त्यांनी तोडफोड करून त्यांना हवे तसे कृत्य केले, असे वकिलांनी सांगितले. साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारे हे कब्रस्तान नसल्याचे स्पष्ट झाले आहे. येथे एक उंच टेकडी आहे. येथे पांडव आले होते. त्यांना जाळून मारण्यासाठी लाक्षागृह बांधण्यात आले होते. महसूल न्यायालयातही या जागेची नोंद लाक्षागृह म्हणून करण्यात आली आहे. हिंदू पक्षाचे वकील रणवीरसिंह तोमर यांच्या मते, न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे ती जागा कब्रस्तान नसल्याचे नमूद केले आहे. महसूल न्यायालयातही ही जागा लाक्षागृह म्हणून नोंद आहे. ही जागा प्राचीन काळापासून हिंदूंसाठी तीर्थक्षेत्र आहे.

Exit mobile version