असा असणार ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’

असा असणार ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’

शनिवार, ५ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हैदराबाद येथे जाणार असून त्यांच्या हस्ते स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचे लोकार्पण होणार आहे. हैदराबादमध्ये तयार करण्यात आलेला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी हा ११ व्या शतकातील भक्ति संप्रदायातील संत श्रीरामानुजाचार्य यांचा पुतळा असून तो २१६ फिट उंच असणार आहे. संध्याकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा पुतळा राष्ट्राला समर्पित केला जाईल.

अकराव्या शतकातील भक्ती संप्रदायातील संत रामानुजाचार्य यांनी इक्वॅलिटी अर्थात समतेच्या संकल्पनेचा प्रचार प्रसार केला असून जगातील सर्व धर्म, जाती, संप्रदाय यांच्यात समानता असावी अशी त्यांची धारणा होती.

असा असणार संत रामानुजाचार्य यांचा पुतळा
संत रामानुजाचार्य यांच्या या स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीची उंची २१६ फूट इतकी असणार आहे. तर हा पुतळा पंच धातूंपासून बनवला जाणार आहे. ज्यामध्ये सोने, चांदी, तांबे, पितळ आणि जस्त या पाच धातूंचा समावेश असणार आहे.

हे ही वाचा:

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’नंतर आता पंतप्रधानांचे लक्ष ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’कडे

धक्कादायक! मृत महिलेच्या नावाने लसीकरण प्रमाणपत्र!

राहुल यांच्या वक्त्यव्यावर केंद्रीय मंत्र्यांचा हल्लाबोल…

मुंबई पालिकेस दिवाळखोरीकडे नेणारा अर्थ (?) संकल्प!

हा जगातील सर्वात उंच पुतळ्यांपैकी एक पुतळा असेल. हा पुतळा बैठ्या स्थितीत असणार आहेह. एका ५४ फुटी इमारतीवर हा पुतळा बांधण्यात आला आहे. ही इमारतच पाया असेल ज्याचे नाव ‘भद्रा वेदी’ असे ठेवण्यात आले आहे. या इमारतीत वैदिक डिजिटल लायब्ररी, संशोधन केंद्र, प्राचीन भारतीय संहिता, एक अद्ययावत सभागृह अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी असणार आहेत. या पुतळ्याची संकल्पना रामानुजाचार्य आश्रमाचे चीन्ना जीयार स्वामी यांनी मांडली आणि प्रत्यक्षात उतरवली.

या स्टॅचू ऑफ इक्वॅलिटीच्या सभोवाली १०८ दिव्य देसम् म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारची मंदिरे असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मंदिरांनाही भेट देतील. हे वर्ष रामानुजाचार्य यांचे एक हजारावे जयंती वर्ष असून रामानुज सहस्त्रावधी समारोह या कार्यक्रमा अंतर्गत पुतळ्याचे लोकार्पण केले जाणार आहे.

Exit mobile version