‘ही’ आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती मंदिरे

‘ही’ आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती मंदिरे

गणेश चतुर्थीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा ३१ ऑगस्टला बाप्पाचे आगमन होणार आहे. महाराष्ट्रात होणारा हा पवित्र उत्सव पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने पोहोचतात. यानिमित्त गणेश मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते. अशा वेळी, गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रातील काही खास मंदिरे आहेत. जिथे गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रचंड गर्दी उसळलेली असते.

मुंबईतील दादर येथे असलेले सिद्धिविनायक मंदिर हे गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रात भेट देण्याचे सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे. गणेश चतुर्थीच्या उत्सवात दररोज लाखो भाविक गणेश दर्शनासाठी तेथे जात असतात. या उत्सवाच्या निमित्ताने सर्वसामान्यांपासून ते बॉलीवूड स्टार्स आणि अनेक मान्यवर सिद्धी विनायकाच्या दर्शनासाठी जातात.

पाली येथील बल्लाळेश्वर मंदिरात गणपतीचे प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराची खासियत म्हणजे येथे गणपतीची मूर्ती सर्वसामान्य व्यक्तीच्या कपड्यात म्हणजेच धोती-कुर्त्यामध्ये विराजमान आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त या मंदिराभोवती जत्राही भरवली जाते.

रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे मंदिराचे स्थान भाविकांसाठी अतिशय खास आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे देशातील ज्या मंदिरांमध्ये मूर्तीचे तोंड पश्चिमेकडे असते त्या मंदिरांमध्ये याचा समावेश आहे. गणेश चतुर्थीनिमित्त येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

चाकरमान्यांनो टोल भरू नका

काँग्रेसचे पदाधिकारी म्हणाले, बरे झाले मविआ सरकार पडले

न्यायमूर्ती उदय लळित यांनी घेतली नव्या सरन्यायाधीशपदाची शपथ

धक्कादायक! कुरापती चीन अरुणाचलजवळ करतोय बांधकाम

पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. गणेश चतुर्थी हा सण शहरातील जवळपास प्रत्येक चौकात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी भेट देण्यासाठी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाता येईल. गणेश चतुर्थीनिमित्त येथे अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि लोक त्यात सक्रिय सहभाग घेतात. गणेश चतुर्थीच्या सणाच्या दिवशी या ठिकाणांव्यतिरिक्त, महाराष्ट्रातील इतर अनेक ठिकाणांना भेट देता येते जसे की महाडचे अष्टविनायक वरदविनायक मंदिर, थेऊरचे चिंतामणी मंदिर आणि लेण्याद्रीचे श्री गिरजात्मज गणपती मंदिर.

Exit mobile version