परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींना मंगळसूत्र काढण्यास सांगितले

परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींना मंगळसूत्र काढण्यास सांगितले

कर्नाटकची राज्य सेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींना त्यांच्या सर्व दागिन्यांसह मंगळसूत्रही काढून ठेवण्यास सांगण्यात आल्याने कर्नाटकमध्ये खळबळ उडाली आहे.

कर्नाटक राज्य सेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींना मंगळसूत्रासह अन्य दागिने, पायातल्या आणि कानातल्या रिंगाही काढून ठेवण्यास सांगण्यात आले होते. तर, अशा प्रकारे दागिने काढून ठेवण्याच्या सूचना केवळ हिंदूंनाच देण्यात आल्या होत्या, असा दावा भाजपचे आमदार बसनगौडा यातनाल यांनी केला आहे. तर, मंगळसूत्र काढून ठेवण्यास ज्या विद्यार्थिनींना सांगण्यात आले होते, त्यापैकी एकीने परीक्षा हॉलच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षक हिजाब घातलेल्या महिलांची तपासणी करत होते, मात्र त्यांना तसेच आत जाण्यास सांगत होते,’ असे सांगितले.

‘हिंदू संस्कृतीत मंगळसूत्र काढून ठेवण्यास सांगण्याची अजिबातच आवश्यकता नाही. आम्हाला जेव्हा ते काढायचे असेल, तेव्हा आम्ही ते काढू. मी मंगळसूत्र आणि जोडवी काढली आणि मगच आत गेले. मात्र त्यांनी हिजाबमधील मुलींना केवळ तपासले आणि आत जाऊ दिले. आम्हालाही त्यांनी त्याच प्रकारे तपासून आत जाऊ दिले पाहिजे होते,’ असे एका विद्यार्थिनीने सांगितले.

हे ही वाचा:

शेतांत आग लावण्यास विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यालाच राब जाळायला लावले!

महिला सैनिकांसाठी केंद्र सरकारची भेट!

माझ्या डोळ्यादेखत मुलानं मुख्यमंत्री व्हावं, अजित पवार यांच्या मातोश्रींची इच्छा!

इस्रायलच्या सैन्यांच्या श्वानांचा क्रूर हल्ला; हमासचे दहशतवादी ठार!

कर्नाटकमधील राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत काही विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले होते. काही विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये ब्लूटूथचा वापर करून कॉपी करत असल्याचे आढळले होते. त्यामुळे परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देताना कसून तपासणी केली जात आहे.

Exit mobile version