बाबुलनाथच्या शिवलिंगाला कोणत्याही प्रकारचे तडे गेलेले नाहीत याविषयीची पुष्टी आता आयआयटी मुंबई यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. विश्वस्तांनी नियुक्त केलेल्या आयआयटी मुंबईने केलेल्या वैज्ञानिक निरीक्षणाच्या आधारे शिवलिंगाची झीज यासंबंधी अहवाल तयार करण्यात आला आहे. याबाबत श्री बाबुलनाथ देवालयाचे विश्वस्त यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
आयआयटी मुंबईने जातीने हजर राहून शिवलिंगाचे परीक्षण केले, त्याचप्रमाणे त्याची छायाचित्रं काढून शिवलिंगाला कोणत्याही प्रकारचा तडा गेला नसल्याचे यामध्ये स्पष्ट झाले आहे. भक्तांकडून शिवलिंगाला अर्पण करण्यात येणाऱ्या विविध साहित्यांचे नमुनेही आयआयटी मुंबईने घेतले आणि आगामी काळात मोठ्या प्रमाणावर शिवलिंगाची झीज होण्यास जबाबदार घटक या वास्तूत असल्याचे चाचणीतून पुढे आले आहे.
हे ही वाचा:
विश्वविजेती निखत झरीन गोपीचंदच्या पावलावर पाऊल टाकणार, उघडणार बॉक्सिंग अकादमी
कॅलिफोर्नियाच्या गुरुद्वारात झाडल्या गोळ्या, २ जण जखमी
सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरीची राजकारणात उडी
आगीत साकीनाकाजवळील दुकान भस्मसात, एकाचा मृत्यू
काय आहे निरीक्षणाचा अहवाल
शिव आणि गणेश या देवांच्या मूर्तींची पूजा करताना या मूर्ती अनुक्रमे ग्रेनाईट आणि मार्बल या प्रकारच्या दगडांत तयार करण्यात आल्या असून त्यांना अर्पण करण्यात येणाऱ्या घटकांत आम्लीय व द्रावरूपी घटक असल्याने कालांतराने, झीज किंवा तडा जाणे आणि पापुद्रे पडणे असे होऊ शकते. कारण अनेकवेळा मूर्ती वर जलाभिषेक झाल्यामुळे मूर्ती ओल्या राहतात. त्या मूर्ती , सुक्या करण्याचे चक्र सुरू असते. सभोवताली आर्द्रता वाढल्याने मोठ्या प्रमाणावर अपघर्षण म्हणजेच ओरखडे उमटणे, झीज होणे आणि छोटे तडे जाणे त्याचप्रमाणे मूर्तीवर रसायनांचा वापर गंभीर नुकसानाचे कारण ठरू शकते. दूषित साहित्याचा वापर करून शिवलिंग अथवा अन्य मूर्तींवर अभिषेक करण्यात आल्यास दीर्घ कालावधीसाठी नुकसान होण्याची शक्यता आहे. आजच्या तारखेपर्यंत येथील मूर्ती किंवा शिवलिंगाला तडे गेलेले नाहीत, मात्र बरीच झीज झाली असल्याचे निरीक्षणातून समजते आहे.
अहवालातील निरीक्षणातून केलेल्या शिफारसी
मूर्तींचे आयुर्मान वाढावे यासाठी झीज करणाऱ्या साहित्याचा वापर थांबवावा अशा काही शिफारसी या अहवालातून शिवलिंगाचे संवर्धन आणि टिकाऊपणासाठी करण्यात आल्या आहेत. गायीच्या दूधाचा वापरही थांबविला पाहिजे. जलाभिषेकाचे प्रमाणही कमी केले पाहिजे. यासंदर्भात विश्वस्तांकडून शिफारसींचा अभ्यास केला जात असून लवकरच अंमलबजावणी सुरू होईल. तोपर्यंत सुरू असलेली व्यवस्था कायम राहील असे विश्वस्तांकडून सांगण्यात आले आहे.