अयोध्येत प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर दर्शनासाठी मंदिराबाहेर लाखो भक्तांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.लाखो रामभक्त रोज प्रभू रामांची आराधना करत आहेत.याशिवाय राम मंदिराच्या उभारणीसाठी आणि आपल्या श्रेद्धेपोटी अनेक भाविक सढळ हाताने मंदिराला देणगी देत आहेत.देशभरातून अनेक भाविक आप-आपल्या परीने प्रभू रामांसाठी भेटवस्तू देत आहेत.या अगोदर, मंदरासाठी भली मोठी घंटा, अगरबत्ती, मोठा ढोल अशा अनेक वस्तू देणगी स्वरूपात आल्या होत्या.या मालिकेत अखिल भारतीय मांग समाजाकडून राम मंदिराच्या गर्भगृहात झाडू मारण्यासाठी चांदीचा झाडू दान करण्यात आला आहे.हा चांदीचा झाडू राम जन्मभूमी ट्रस्टकडे सोपवण्यात आला असून या झाडूचा वापर केवळ गर्भगृहाच्या स्वच्छतेसाठीच करावा, असे आवाहन समाजाकडून करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते २२ जानेवारी रोजी प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पडला.सोहळ्याला नामांकित व्यक्तींसह हजारो राम भक्त उपस्थित होते.सोहळ्यादिवशी देशभरात दिवाळी साजरी करण्यात आली.प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर राम मंदिराचे द्वार भाविकांसाठी उघडण्यात आले.त्यानंतर लाखो भक्तांची रांग पाहायला मिळाली.प्रभू रामांचे दर्शन घेऊन रामभक्त आपल्या देवतेला काहीतरी अर्पण करत आहेत.याच भावनेने भारतीय मांग समाजाने रामजन्मभूमी ट्रस्टला चांदीचा झाडू दान केला आहे. या चांदीच्या झाडूने राम मंदिराचे गर्भगृह स्वच्छ केले जाणार आहे. हा झाडू ११ दिवसांत तयार झाला आहे. चांदीच्या झाडूचे वजन १ किलो ७५१ ग्रॅम असून यामध्ये १०८ चांदीचे खांब (कांड्या) बसवण्यात आल्या आहेत.या चांदीच्या झाडूच्या वरच्या भागात कमळाच्या फुलावर देवी लक्ष्मी विराजमान आहे.
हे ही वाचा:
बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदी सम्राट चौधरी, विजय सिन्हा यांची वर्णी
एनआयएने फरार दहशतवाद्याचे लावले पोस्टर, ५ लाखांचे बक्षीसही जाहीर!
आमच्यावरील तो आरोपांचा हल्ला आणि आमचा प्रतिकार केसस्टडी बनेल!
समाजाची मागणी काय?
अखिल भारतीय मांग समाजाचे सदस्य मधुकर राव म्हणाले की, आम्ही जगातील पहिला चांदीचा झाडू भगवान रामाला समर्पित केला आहे. २२ जानेवारीला प्रभू राम आपल्या भव्य महालात विराजमान असताना देशभरात दिवाळी साजरी करण्यात आली. त्याच दिवशी अखिल भारतीय मांग समाजाने ठरवले की राम मंदिरासाठी चांदीचा झाडू दान करायचा. उज्जैन येथील महाकाल मंदिरात विधीनुसार या झाडूची पूजा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की,
या झाडूचा वापर केवळ राम मंदिराच्या गर्भगृहात झाडू मारण्यासाठी करावा, अशी मागणी समाजाकडून करण्यात आली आहे.