गुजरात उच्च न्यायालयाने गुरुवारी आमिर खानचा मुलगा जुनैद खानचा पहिला चित्रपट ‘महाराज’ प्रदर्शित करण्यास स्थगिती दिली. हा चित्रपट हिंदू पंथाच्या अनुयायांविरूद्ध हिंसाचार भडकवेल, असा दावा करत एका हिंदू गटाने याचिका दाखल केली होती.
सिद्धार्थ मल्होत्रा दिग्दर्शित आणि आदित्य चोप्रा निर्मित हा चित्रपट १४ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार होता. भगवान कृष्णाचे भक्त आणि वल्लभाचार्यांच्या अनुयायांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवर हा स्थगिती आदेश जारी करण्यात आला आहे. हा पुष्टीमार्ग संप्रदाय आहे. १८६२च्या महाराज बदनामी प्रकरणावर आधारित हा चित्रपट सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम करेल आणि संप्रदाय व हिंदू धर्माच्या अनुयायांविरुद्ध हिंसाचार भडकवेल, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
याचिकेनुसार, १८६२चे महाराज बदनामी प्रकरण, हे एका प्रतिष्ठित व्यक्तीने केलेल्या गैरवर्तणुकीच्या आरोपांमुळे पेटलेले आणि मुंबईच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इंग्लिश न्यायाधीशांनी निकाल दिलेले आहे. यात हिंदू धर्माची निंदा करण्यात आली असून श्रीकृष्णाविरुद्ध तसेच, भक्तिगीते आणि भजनाबाबत निंदा केली आहे, असे नमूद करण्यात आले आहे.
या गटाने असा युक्तिवाद केला की, कथानक कळू नये यासाठी हा चित्रपट ट्रेलर किंवा कोणत्याही प्रचारात्मक कार्यक्रमांशिवाय गुप्तपणे प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी दिल्यास त्यांच्या धार्मिक भावना गंभीरपणे दुखावल्या जातील, त्यामुळे कधीही भरून न येणारे नुकसान होईल, असा युक्तिवादही करण्यात आला.
गुजरात उच्च न्यायालयाच्या न्या. संगीता विषेन यांनी पुश्तीमार्गींच्या निवेदनाचा विचार केला आणि कोणत्याही प्रकारे चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याचा हंगामी आदेश दिला. आता या प्रकरणाची १८ जून रोजी सुनावणी होणार आहे.
सोशल मीडियावर ‘बॉयकॉट नेटफ्लिक्स’ कॉल ट्रेंड होत होता, अनेकजण याविरोधात बाहेर आले होते आणि दावा केला होता की, नेटफ्लिक्स हिंदूविरोधी साहित्याचा प्रचार करत आहे.
हे ही वाचा..
तिसऱ्या कार्यकाळातील पहिली भेट इटलीला दिल्याचा आनंद
‘इज ऑफ डुईंग बिझनेस’च्या ऍडिशनल प्रोग्रॅम सेक्रेटरी पदी संजय ढवळीकर यांची नियुक्ती!
सरसंघचालकांचे खडे बोल, नेमके कोणासाठी?
दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर द्या: पंतप्रधानांच्या सूचना
नेटफ्लिक्सने गेल्या महिन्यात या संदर्भात प्रसिद्धी पत्रक जाहीर केले होते. त्यात ‘महाराज’ हा चित्रपट पत्रकार आणि समाजसुधारक करसनदास मुलजी यांच्यावर बेतला आहे. ते महिलांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक सुधारणांसाठी लढणारे अग्रगण्य वकील होते, असे नमूद केले आहे.