‘शोभायात्रांची सुरुवात डोंबिवलीत झाली आणि मग त्याचे सगळ्यांनी अनुकरण केले’

श्रीगणेश मंदिर संस्थानच्या नववर्षाच्या शोभायात्रेत मुख्यमंत्र्यांनी केले प्रतिपादन

‘शोभायात्रांची सुरुवात डोंबिवलीत झाली आणि मग त्याचे सगळ्यांनी अनुकरण केले’

श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नववर्षाच्या शोभायात्रेत सहभागी झाले होते. अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या शोभायात्रेप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले, या ठिकाणी एवढा उत्साह पाहतोय कि मी यापूर्वीच देखील दहा वर्षांपूर्वी या शोभायात्रेमध्ये सहभागी झालो होतो, त्यावेळेस आबासाहेब पटवारी आणि सर्व आपली टीम आहे त्यावेळेस देखील त्याचे आयोजन मोठ्या उत्साहात झाले होते. आज २५ वे वर्ष आहे या ठिकाणी ही  शोभायात्रा निघते आहे. हे नवीन वर्ष सर्वाना सुखाचे, ,समृद्धीचे, आनंदाचे,आरोग्यदायी जावो. अशा मनापासून शुभेच्छा देतो. आणि या नवीन वर्षांत या राज्यावरची देशावरची सगळी संकटे, अरिष्टे, दूर होवो गणरायाकडे साकडे घालतो.

मुख्यमंत्री म्हणाले की, डोंबिवली म्हणजे सांस्कृतिक नगरी आहे आणि या डोंबिवलीच्या अनेक रत्ने दिली आहेत. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, साहित्यिक असे अनेक लोक या डोंबिवलीकरांनी आपल्या राज्याला नाहीतर देशाला दिलेले आहेत. आणि म्हणून या डोंबिवलीमध्ये सुरवात झाली या शोभायात्रांची आणि मग त्याचे अनुकरण सगळीकडे झाले हा इतिहास आहे. ही आपली परंपरा आहे संस्कृती आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मागील दोन वर्षांपासून सगळ्या सणांप्रमाणे गुढीपाड्व्यादिवशी  मुंबई आणि उपनगरांमध्ये निघणाऱ्या शोभायात्रांवर कोरोनाचे  सावट होते. त्यामुळे सण अगदी छोट्या प्रमाणांत साजरे केले जात होते. आता या पार्श्वभूमीवर मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.  सरकारचा नव्या वर्षाचा संकल्प आपण अर्थसंकल्पात पाहिलेला आहे. राज्याचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून सर्व घटकांना न्याय देण्याचे काम अर्थसंकल्पात केले आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार महिला, तरुणाई अशा सगळ्यांचा विचार आपण या अर्थसंकल्पात केला आहे. असा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा आणि सरकारचा नववर्षांचा संकल्प सांगितला. मुबईसह राज्यात अनेक ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या आहेत.

ठाणे आणि डोंबिवलीच्या शोभायात्रेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाल्यामुळे ठाणे तसेच डोंबिवलीकरांचा उत्साह ओसंडून वाहात होता. राज्याच्या विविध भागांत वेगवेगळ्या पद्धतीने उत्साह व्यक्त करण्यांत येतो. अनेक ठिकाणी शोभायात्रा काढण्यात येतात. या शोभायात्रां मध्ये अनेक सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर संदेश देण्याचे काम केले जाते. यंदाही नाशिक, ठाणे, डोंबिवली, आणि इतर भागात सुद्धा शोभायात्रा निघाल्या आहेत. या शोभायात्रेत तरुणाईचा उत्साह दिसून येतो.

हे ही वाचा:

संजय राऊतयांनी आता डोक्यालाच गुंडाळले!

वींद्र वायकरसुद्धा ठाकरेंना सोडून चालले का?

इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिशीच्या यादीतून मेहुल चोक्सी गायब!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेमात चिनी फॉलोअर्स

दरम्यान , ठाण्यातल्या शोभायात्रेमध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाल्यामुळे ठाणेकरांचा उत्साह अधिकच वाढला आहे. ठाण्यातल्या कौपिनेश्वर मंदिरात मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतले मी गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या महाराष्ट्रवासीयांना   खूप शुभेच्छा देतो. सगळ्यांना नवीन वर्ष सुख समाधानाचे आणि आरोग्यदायी जावो. कोरोनामुळे आपल्या सणांवर निर्बंध आणि मर्यादा होत्या पण आपल्या सरकारने बंदी उठवल्यानंतर गोविंदा, दही हंडी, गणपती, नवरात्रोत्सव, दिवाळी असे सर्वच सण महाराष्ट्राच्या जनतेने जल्लोषात पार पडले. आजचा गुढी पाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी जनता सहभागी झाली आहे. यामध्ये अनेक चित्ररथ या यात्रेत असून शोभायात्रेपेक्षा दुप्पट उत्साह नागरिकांमध्ये दिसत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळेस म्हंटले आहे.

Exit mobile version