काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांना मिळणार ९० हजार पगार!

काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टच्या १५० व्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांना मिळणार ९० हजार पगार!

वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरासाठी ५० पुजाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.पुजाऱ्यांची भरती तीन श्रेणी प्रकारातील असणार आहे.या तीन श्रेणीमध्ये वरिष्ठ पुजाऱ्याला ९० हजार रुपये, कनिष्ठ पुजाऱ्याला ७० हजार आणि सहाय्यक पुजाऱ्याला ४५ हजार रुपये दरमहिना वेतन दिले जाणार आहे.एवढेच नाहीतर पुजाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे अनेक भत्तेही दिले जाणार आहेत.काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टच्या १५० व्या पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.नागेंद्र पांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.तसेच मंदिरातर्फे संस्कृत स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचा बैठकीचे निर्णय घेण्यात आला.या स्पर्धेचे आयोजन आंतरशालेय स्तरांसह सर्व स्तरांवर केले जाणार आहे.तसेच शहरातील बसस्थानके आणि घाटांवर राहणाऱ्या लोंकाना देवाचा प्रसाद दररोज देण्यात येणार आहे.या प्रसादात खिचडी, चणा भात आणि पुरी भाजी इत्यादींचा समावेश असणार आहे.

हे ही वाचा..

पी व्ही नरसिंह रावांसह चरणसिंग आणि डॉ. स्वामिनाथन यांना ‘भारतरत्न’

“गोळीबाराच्या गंभीर घटनेवरून विरोधकांनी राजकारण करू नये”

उत्तराखंड: हल्द्वानीत झालेली दंगल आधीच नियोजित होती!

हल्दवानीमध्ये दंगलखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

ट्रस्टच्या बैठकीत चार दशकानंतर पुजारी सेवा नियमावली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ज्यामध्ये वरिष्ठ ,कनिष्ठ आणि सहाय्यक अशा तीन श्रेणीमध्ये ही पदे आहेत.यामध्ये सुमारे ५० पुजाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.श्रेणीतील पदाप्रमाणे रंगाचा ड्रेस कोड असणार आहे, ज्यामध्ये कुर्ता, धोतर आणि दुपट्टा इत्यादींचा समावेश असणार आहे.

Exit mobile version