नितेश राणेंचा मोर्चा आणि त्याच रात्री लागला मुलीचा शोध

२ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात भाजपा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

नितेश राणेंचा मोर्चा आणि त्याच रात्री लागला मुलीचा शोध

कोल्हापूरच्या लव्ह जिहाद प्रकरणातील गेल्या अठरा दिवसांपासून बेपत्ता असलेली मुलगी अखेर सापडली आहे. कोल्हापूर पोलिसांनी बेपत्ता अल्पवयीन मुलीसह तिला फूस लावून तिला पळवून नेलेल्या मुलाला शोधलं आहे. कर्नाटकातील संकेश्वरमधून त्याला ताब्यात घेण्यात आले असून, मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

कोल्हापूरमधील १३ वर्षाची मुलगी गेल्या १८ दिवसांपासून बेपत्ता होती. या लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून बुधवार, २ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात भाजपा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. विशेष म्हणजे त्यांच्या या मोर्च्यानंतर त्याच रात्री अल्पवयीन मुलगी आणि तिला घेऊन जाणाऱ्या तरुणाला शोधून काढलं आहे.

लव्ह जिहाद प्रकरणावरून कोल्हापुरात तापले होते. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील भवानी मंडपातून जुना राजवाडा पोलिस ठाण्यासमोर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आंदोलनानंतर कोल्हापूर पोलिसांनी मुलीचे अपरहण करणाऱ्या संशयिताचा फोटो जाहीर केला होता. अल्ताफ काझी या २२ वर्षीय संशयीताचा फोटो कोल्हापूर पोलिसांनी प्रसिद्ध करत, अपरहणकर्ता दिसल्यास ताबडतोब संपर्क करण्याचं आवाहन केले होते. अखेर काल उशिरा रात्री कर्नाटकातील संकेश्वरमधून पोलिसांनी मुलीला आणि आरोपीला ताब्यात घेतले.

याप्रकरणी भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे. महाराष्ट्रात आता जनाबसेना सत्तेवर नाही याची हिंदू मुलींना फूस लावणाऱ्या लांडग्यांनी नोंद घ्यावी, अशा खणखणीत शब्दात त्यांनी लव्ह जिहाद करणाऱ्यांचे कान टोचले आहेत.

हे ही वाचा:

संभाजी भिडेंनी पत्रकाराला सांगितले, आधी टिकली लाव मगचं बोलू

मुंबईत एका मुलीचे फुटपाथवरून अपहरण, दोन महिला अटकेत

राज्यातील बँकिंग घोटाळ्यांची होणार चौकशी

भारताने बांगलादेशला नमवले आणि पाकिस्तानची केली कोंडी

१७ ऑक्टोबर पासून ही इयत्ता नववीत शिकत असलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. दिवाळीपूर्वी पेपर द्यायला गेली होती, पण परत घरीच आली नाही. यानंतर मुलीच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. ही मुलगी गायब झाली आणि त्याचवेळी मुस्लिम युवकही गायब झाला होता.

Exit mobile version