भारतीय चित्रपट निर्मात्या असणाऱ्या लीना मणीमेकलाई यांनी सोशल मीडियावर नुकताच त्यांच्या ‘काली’ या माहितीपटाचं पोस्टर शेअर केले होते. त्यांनतर काली यांच्या या माहितीपटावर देशभरात जोरदार टीका झाली. या वादानंतर अखेर ट्विटरने लीना यांची पोस्ट ट्विटरवरून पोस्ट हटवली आहे. या माहितीपटाचे पोस्टर प्रदर्शित झालेल्या कॅनेडियातील संग्रहालयाने माफी मागितली आहे.
टोरंटो मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीने आयोजित केलेल्या मल्टीमीडिया कथाकथनाच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून लीना मणीमेकलाई यांनी तयार केलेल्या काली चित्रपटाचे पोस्टर टोरंटो येथील आगा खान संग्रहालयात दाखवण्यात आले. या पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर या पोस्टरचा जोरदार विरोध झाला. पोस्टरमध्ये माँ काली धूम्रपान करताना दाखवण्यात आली होती. यानंतर समुदायाने सोमवार, पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना तक्रार पत्र पाठवले. तक्रारीत म्हटले आहे की, पोस्टरमध्ये भगवान काली धुम्रपान करताना दाखवण्यात आले आहे, जे अत्यंत चुकीचे आहे. आता विद्यापीठाने ज्या पेजवर हे पोस्टर शेअर केले होते त्यावर माफी मागितली आहे.
हे ही वाचा:
आमदारांच्या उठावाला संजय राऊतचं जबाबदार
‘नवं सरकार सर्वसामान्यांचं आहे’
वीर सावरकरांचे विचार आम्हाला महाविकास आघाडीत असताना मांडता येत नव्हते!
ब्रिटनच्या आरोग्य सचिव, अर्थमंत्र्यांनी दिला राजीनामा
दरम्यान, देशभरातून निर्मात्या लीना यांच्यावर टीका होत असताना अयोध्येतील एका महंतांनी लीना मणीमेकलाई यांना धमकी दिली आहे. अयोध्येतील हनुमान गढी मंदिराचे महंत राजू दास यांनी लीना याचे शीर धडापासून वेगळे करण्याची धमकी दिली आहे.