25 C
Mumbai
Friday, January 3, 2025
घरधर्म संस्कृतीप्रेमप्रकरणे, प्रेमविवाहाचे धोके सांगण्यासाठी केरळमध्ये दाखवला 'द केरळ स्टोरी'

प्रेमप्रकरणे, प्रेमविवाहाचे धोके सांगण्यासाठी केरळमध्ये दाखवला ‘द केरळ स्टोरी’

बिशपच्या अधिपत्याखाली येणाऱ्या इडुकी संस्थेने त्यांच्या १०वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांना दिले प्रशिक्षण

Google News Follow

Related

केरळमधील सायरो मालाबार कॅथलिक चर्चच्या अधिपत्याखाली येणाऱ्या इडुकी डायोसिज या संस्थेने किशोरवयीन मुला-मुलींना प्रेमप्रकरणातील धोके समजावून देण्यासाठी ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट दाखवला आहे. केरळ सरकारने दूरदर्शनवर हा चित्रपट दाखवण्याबाबत नाराजी दर्शवल्यावर दोन दिवसांनंतर ही बाब उघड झाली आहे.

बिशपच्या अधिपत्याखाली येणाऱ्या इडुकी संस्थेने त्यांच्या १०वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा भाग म्हणून रविवारी हा चित्रपट दाखवला. इडुक्की डायोसीज मीडिया कमिशनचे अध्यक्ष फादर जिन्स काराक्कट यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे. ‘प्रेम प्रकरणे आणि प्रेमविवाह यामागील धोके समजावून सांगण्यासाठी तरुणांना शिक्षित करण्याकरिता हा चित्रपट दाखवण्यात आला होता,’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना हा चित्रपट पाहून, त्यावर चर्चा करून नंतर त्याबाबत लिहिण्यास सांगितले होते. या प्रकरणी संस्थेने एक पुस्तकही विद्यार्थ्यांना वितरित केले. प्रत्येक सुटीच्या दिवसात विद्यार्थ्यांसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जातो, असे फादर कराक्कट यांनी सांगितले. यासाठी विशिष्ट विषय निवडले जातात आणि पुस्तके तयार केली जातात.

हे ही वाचा:

काँग्रेसची गळती कायम ; प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेना प्रवेश

‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, होता आणि राहील’

‘अनिल मसिह यांना विचारू, असे का केले?’

एलन मस्क यांनी टाकले मार्क झुकेरबर्गला मागे!

‘या वर्षी हा कार्यक्रम २, ३ आणि ४ एप्रिल रोजी घेण्यात आला. १०वी, ११वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना प्रेमप्रकरणांबाबत माहिती देण्यासाठी यंदा पुस्तके तयार करण्यात आली,’ असेही त्यांनी सांगितले. ‘आजकाल, किशोरवयीन मुले मोठ्या प्रमाणावर प्रेमात पडत आहेत आणि संकटांना सामोरे जात आहेत. त्यामुळे अशा धोक्यांबद्दल आमच्या मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा आमचा हेतू होता,’ असे त्यांनी स्पष्ट केले. ५ एप्रिल रोजी दूरदर्शनवर ‘द केरला स्टोरी’ दाखवला जाईल असे जाहीर केल्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी या निर्णयाचा निषेध केला.

लोकसभा निवडणुकीपूर्वी ध्रुवीकरणाचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. केरळ काँग्रेसचे नेते व्हीडी सतीसन यांनीही सरकारी चॅनलने दूरदर्शनवर ‘द केरला स्टोरी’ प्रदर्शित करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे आणि हा चित्रपट “असत्याचा संग्रह” असल्याचे म्हटले आहे. तर, भाजप केरळच्या समाजात प्रवेश करू न शकल्याने आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला राजकीय अजेंडा पुढे नेण्याच्या आशेने भाजपने हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे, असा आरोप माकपच्या राज्य सचिवांनी केला.

‘द केरला स्टोरी’ या चित्रपटात जबरदस्तीने / आमिषाने केलेले धार्मिक धर्मांतर, आयएसआयएसमध्ये सहभागी करून घेणे आणि लव्ह जिहाद यासारख्या विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. सुरुवातीला पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. मात्र ती नंतर उठवण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा