द काश्मीर फाइल्स या चित्रपटाची आता देशभर चांगलीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी शनिवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला. पंतप्रधानांच्या भेटीला विवेक अग्निहोत्री यांच्यासह अभिनेत्री व त्यांची पत्नी पल्लवी जोशी, चित्रपटाचे निर्मातेही होते.
द काश्मीर फाइल्स हा चित्रपट काश्मीरच्या खोऱ्यात हिंदू काश्मिरी पंडितांवर झाले अनन्वित अत्याचारांच्या वेदनादायक कहाणी सांगणारा असा चित्रपट आहे. हा चित्रपट ११ मार्चला रीलिज झाला. मात्र त्यानंतर या चित्रपटाला फारशी प्रसिद्धी मिळू नये, अशी काळजी मुख्य प्रवाहातील प्रसिद्धी माध्यमांनी घेतली. पण लोकांनी हा चित्रपट पाहायला सुरुवात केल्यानंतर मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातूनच लोकांनी चित्रपटाला पसंतीची पावती दिली.
हे ही वाचा:
सोनिया, राहुल, प्रियांका राजीनामा देणार? बातमीने खळबळ
‘देवेंद्र फडणवीसांना पाठवलेल्या नोटिशीची करणार होळी’
भारतविरोधी जिहादसाठी केली जाणार होती मुस्लिम तरुणांची भर्ती
मविआ सरकार बॅकफूटवर; फडणवीसांच्या घरी जाऊन नोंदवणार जबाब
या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली असून मिथुन चक्रवर्ती यांचीही प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. मराठी चित्रपट अभिनेता, लेखक, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरनेही यात एक वेगळी भूमिका साकारली आहे. सध्या देशभरातच नव्हे तर परदेशातही या चित्रपटाचे शो सुरू आहेत. त्याला विलक्षण असा प्रतिसाद मिळत असून त्या प्रतिसादाचे व्हीडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. चित्रपटात दाखविण्यात आलेले काश्मिरी पंडितांचे हत्याकांड पाहून एकीकडे राग उफाळून येत असताना डोळ्यातील अश्रुही थांबत नाहीत, असे चित्र थिएटर्समध्ये पाहायला मिळते आहे.
या चित्रपटात इस्लामी दहशतवादाच्या आक्रमणाचे चित्रण झालेले असल्यामुळे काही थिएटरमध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्याचे प्रयत्नही झाले आहेत, पण ते हाणून पाडण्यात आले आहेत. तरीही बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहाने मात्र या चित्रपटाला दुर्लक्षित केले आहे.