अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कळसाला मिळणार सुवर्ण झळाळी!

श्रीराम मंदिर निर्माण समितीच्या अध्यक्षांनी दिली माहिती

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कळसाला मिळणार सुवर्ण झळाळी!

अयोध्येतील श्रीराम मंदिराला भेट देण्यासाठी देशभरातून हजारो भाविक अयोध्येत दाखल होत असतात. अशातच आता अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचा कळस हा सोन्याने झळाळणार असल्याची माहिती समोर आली आहे. श्रीराम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. तसेच अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या बांधकामाचा आढावा देखील नृपेंद्र मिश्रा यांनी घेतला.

मंदिरासंबंधी ५ डिसेंबर आणि ६ डिसेंबर रोजी दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नृपेंद्र मिश्रा यांनी ही माहिती दिली आहे. नृपेंद्र मिश्रा माहिती देताना म्हणाले की, मंदिराचे बांधकाम ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्यास आमचे प्राधान्य आहे. मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी १५ मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली असून तोपर्यंत बांधकाम पूर्ण होईल, असा विश्वास आहे. त्याचप्रमाणे भव्य श्रीराम मंदिराच्या कळसाचा अखेरचा १० ते १५ फूट भाग हा सुवर्णजडित असेल, अशीही माहिती मिश्रा यांनी दिली.

हे ही वाचा:

सीरियामध्ये गृहयुद्ध भडकलं; भारतीयांना प्रवास टाळण्याचा भारत सरकारचा सल्ला

मसूद अझहरच्या भाषणाच्या वृत्तानंतर भारताने पाकला ‘दुटप्पीपणा’वरून सुनावले

मालेगाव मनी लाँडरिंग प्रकरण: ईडीकडून १३.५ कोटी रुपये जप्त

हे तर मोनालिसापेक्षाही गूढ स्मित…

मंदिर आणि मंदिर संकुलाची उभारणी वेळापत्रकाप्रमाणेच होत असल्याचेही नृपेंद्र मिश्रा म्हणाले. मंदिराच्या उभारणीसोबतच सप्तमंडप आणि परकोट्याचा तीन चतुर्थांश भागही बांधून पूर्ण होणार आहे. त्याचप्रमाणे, भाविक सुविधा केंद्र, विजेची व्यवस्था आणि अन्य काही भाग ट्रस्टला हस्तांतरित करण्यात येत आहे. मंदिराची उभारणी प्रगतिपथावर असल्याचे नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले.

Exit mobile version