नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात दुसऱ्या धर्माच्या गटाने प्रवेशाचा प्रयत्न केल्याने गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा चर्चेत आहे. या प्रकरणाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस यांनीही यावर प्रतिक्रिया देत निषेध केला.
विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी १३ मे रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात चंदन मिरवणूक काढून काही मुस्लिमांनी प्रवेश करण्याच्या धाडसाचा कडाडून विरोध केला आहे. गेल्यावर्षीही मिरवणूक काढून असेच धाडस दाखवण्यात आले होते. त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात मुस्लिमांना प्रवेश बंदी आहे. अशाप्रकारे देशभरातील अनेक मठ मंदिरे हस्तगत करण्यात आली असून इतिहासातही अशा अनेक घटना घडल्या आहेत, असं मिलिंद परांडे म्हणाले.
हे ही वाचा:
मुंबईत आजारी मुलाला भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोडले चार्टर्ड विमान
एकाच ऍपमधून रेल्वे तिकीट, टॅक्सी, हॉटेल बुक करता येणार
सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स प्रकरणांचा शिवकुमार यांना फटका?
सहा राज्यांमध्ये शंभरहून अधिक ठिकाणी एनआयएकडून छापेमारी
त्र्यंबकेश्वर मंदिरावरही कब्जा करण्याचा हा सुनियोजित कट समजावा. अशा सर्व धर्मांधांवर कठोर कारवाई करून मंदिरांची सुरक्षा वाढवली पाहिजे. सजग हिंदू समाज अशा कोणत्याही अतिक्रमणाला आणि मंदिरात प्रवेश करण्याच्या धाडसाचा कडाडून विरोध करेल. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनानेही योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे, असे मत मिलिंद परांडे यांनी व्यक्त केले आहे.