१३ हजार फूट उंचीवर फडकला राममंदिराच्या चित्राचा ध्वज

१३ हजार फूट उंचीवर फडकला राममंदिराच्या चित्राचा ध्वज

उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील २२ वर्षीय अनामिका शर्मा हिने राममंदिराचे चित्र असलेला ध्वज हातात घेऊन तब्बल १३ हजार फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असताना अनामिका हिने बँकॉकमध्ये ही अद्भुत कामगिरी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनसोहळ्याला केवळ निवडक व्यक्तींनाच निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र अनामिका हिने अतीव धैर्य आणि समर्पणवृत्तीचे दर्शन घडवत १३ हजार फूट उंचावरून उडी मारून प्रयागराज आणि आद्यविमान शास्त्राचे रचनाकार भारद्वाज यांना मानवंदना दिली आहे. अनामिका हिची ही कृती थायलंडच्या नागरिकांसाठीही वेगळ्या अर्थाने महत्त्वाची ठरली आहे. थायलंडमध्ये हनुमानाला संरक्षक म्हणून मानले जाते. त्यामुळे तेही अनामिकाचे प्रेरणास्थान ठरले.

अनामिकाच्या या कर्तुत्वामुळे त्यांची आई प्रियांका शर्मा यांनी आनंद आणि आपल्या मुलीबाबत अभिमान व्यक्त केला आहे. ‘मुलगाही या वयात जी कामगिरी करू शकणार नाही, ते माझी मुलगी अनामिकाने केल्याचा मला खूप अभिमान आहे. प्रभू रामाच्या आशीर्वादामुळेच हे शक्य होऊ शकले आणि ती १३ हजार फूट उंचीवरून उडी मारू शकली,’ असे प्रियांका यांनी सांगितले.

हे ही वाचा:

नेतान्याहू म्हणतात, “युद्ध सर्वोच्च बिंदूवर”

सावधान! राम मंदिराच्या नावाने क्यू-आर कोड पाठवून उकळतायत पैसे

जम्मू-काश्मीरची ‘तहरीक-ए-हुर्रियत’ दहशतवादी संघटना म्हणून घोषित!

म्यानमार मधून मिझोराममध्ये पोहचलेल्या १५१ सैनिकांना भारताचा आधार!

अनामिकाचे वडील निवृत्त लष्करी अधिकारी अजय कुमार शर्मा हेदेखील स्कायडायव्हिंग करतात. त्यांच्यामुळेच अनामिकामध्येही याची आवड निर्माण झाली. ती लहानपणापासूनच या साहसी खेळाचा सराव करत आहे.

Exit mobile version