यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाचा वेगळाच उत्साह दिसत असून दोन वर्षांनी भाविक निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी उत्सुक आहेत. मुंबईतल्या सार्वजनिक मंडळांची लगबग सुरू असून मूर्तींचे आगमन झाले आहे. आगमन सोहळ्याला मुंबईच्या रस्त्यांवर मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळाली होती.
मुंबईचा प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाचे रूप कसे असणार? यंदाची सजावट कशी असणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. दरम्यान, आज लालबागच्या राजाची झलक समोर आली असून यंदा राम मंदिर साकारलं गेलं आहे. पिवळं पितांबर परिधान केलेली बैठी मूर्ती यंदा साकारण्यात आली आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्रूर मानत होतो, पण त्यांनीच माणुसकी दाखवली
‘स्वातंत्र्यदिनानिमित्त सामुहिक शक्तीचे घडले दर्शन’
गृहमंत्री अमित शहा मुंबईत ‘या’ गणेशोत्सवाला भेट देणार
Twin Tower Demolition: काही सेकंदात कोसळले भ्रष्टाचाराचे टॉवर
लालबाग राजा येथे साकारण्यात आलेले राम मंदिर आणि गणेश गल्लीने साकारलेले काशी विश्वनाथ मंदिर भक्तांसाठी आकर्षणाचा विषय बनत असून, मंडळाच्या वतीने आज बाप्पाची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. तर प्रसिद्ध लालबागचा राजाचे प्रथम दर्शन आज सोमवार, २९ ॲागस्ट २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे.