25 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरधर्म संस्कृतीरामनवमीचा सण देशभरात आनंदाने साजरा

रामनवमीचा सण देशभरात आनंदाने साजरा

बघूया महाराष्ट्रातील विविध ठिकाणचा रामनवमीचा उत्सव

Google News Follow

Related

आज रामनवमीच्या निमित्ताने सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. जाणून घेउया कशाप्रकारे साजरा झाला रामनवमीचा सण. रामनवमीच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यामध्ये वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी राम नवमीचे वाळू शिल्प साकारले आहे. आरवली इथल्या समुद्र किनाऱ्यावर वाळूवरती प्रभू श्रीरामाचे वास्तुशिल्प त्यांनी साकारून एक कलाकृती सादर केली आहे.  धाराशिव शहरामध्ये समर्थ नगरच्या श्रीराम मंदिरात १७६ चौरस फुटांची कलायोगी आर्टच्या धाराशिवच्या विध्यार्थांकडून ११ फूट उंच, १६ फूट रुंद अशी भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.

रांगोळीतून प्रभू श्रीराम . सीता माता, लक्ष्मण , हनुमान यांच्या प्रतिमा या रांगोळीमध्ये साकारण्यात आल्या आहेत. यासाठी त्यांना ४५ किलो रंगीत रांगोळीचा वापर करण्यात आला असून त्यासाठी त्यांना पाच तास ३० मिनिटांचा वेळ लागला आहे. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृती पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. तर पुणे इथे तुळशींबाग मंदिरात श्रीरामाचा उत्सव गेल्या ५० वर्षांपासून सुरु असून या वर्षी सुद्धा उत्साहात पार पडला. असे म्हणतात कि या प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले तर सगळ्या इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची भरपूर गर्दी होती.

हे ही वाचा: 

बोरिवली रेल्वे स्टेशनवर विनयभंग करणाऱ्या भजन गायकाला अटक

मोदी-नेत्यानाहू यांच्यातील फरक राऊतांना कळतो तरी का?

कर्नाटकात एकाच टप्प्यामध्ये होणार निवडणुका

पुढची रामनवमी नव्या श्रीराम मंदिरात होईल?

तिकडे शिर्डी मध्ये गेल्या तीन दिवसापासूनच रामनवमीचा उत्सवाला सुरवात झाली आहे. १९११ पासून सुरु झालेला हा रामनवमी उत्सव आजसुद्धा मोठ्या प्रमाणावर चालू असतो. साईबाबा संस्थांनाच्या वतीने २९ मार्च ते ३१ मार्च दरम्यान हा उत्सव तीन दिवसाचा चालू आहे. आजच्या राम नवमीच्या दिवशी मंदिर रात्रभर खुले राहणार असल्याचे संस्थानाने कळवले आहे. रामनवमीच्या उत्सवासाठी दरवर्षी राज्यभरातून शेकडो पालख्या घेऊन साईभक्त पायी शिर्डीत पालख्या घेऊन येतात.

शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात श्री रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्री राम नवमी निमित्त २८ मार्च रोजी अध्यात्म रामायण स्वाहाकार यागास प्रारंभ झालेला असून आज रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने शेकडो दिंड्या शेगाव मंदिरात दाखल झाल्या आहेत. श्री रामजन्मोत्सवाच्या निमित्ताने अकोल्यामध्ये आज भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. इथल्या राजराजेश्वर मंदिरात या रॅली ची सुरवात होऊन शहराच्या मुख्य भागावर बिर्ला राम मंदिराजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला.

हजारो भाविकांच्या उपस्थितीत भजन व कीर्तनाने संपन्न रामजन्मोत्सव बीडच्या श्रीक्षेत्र नेकनूर येथे भजन व कीर्तनाने पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या कीर्तनाने सांगता झाली. यावेळी हजारो स्त्री-पुरुष भाविक उपस्थित होते.जन्मदिन साजरा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यावेळी संपूर्ण परिसर प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने दुमदुमून गेला . भगवान राम हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. त्यांची आदर्श तत्त्वे आजही येथील समाजव्यवस्थेला मार्गदर्शन करतात, असे महाराज म्हणाले.

अकोल्यात मोटारसायकल रॅली
श्री राम जन्मोत्सव सेवा समितीतर्फे मोटारसायकल रॅली अकोल्यात रामनवमीनिमित्त श्री रामजन्मोत्सव सेवा समितीच्या वतीने आज मोटारसायकल रॅली काढण्यात आली.शहरातील आराध्य दैवत राजराजेश्वर मंदिरापासून ही रॅली निघाली आणि शहरभर फिरली. मुख्य मार्गावरील बिर्ला राम मंदिराजवळ संपले .

यवतमाळमध्ये फडकला ५१ फूट उंच भगवा ध्वज
राम नवमीनिमित्त यवतमाळ शहर राममय झाले असून आज सकाळी रामभक्तांनी शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढली. या सकाळच्या मिरवणुकीत भगवे झेंडे व भगवी वेशभूषा परिधान केलेले शेकडो युवक सहभागी झाले होते. या रॅलीचे आयोजन विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने केले होते. या प्रभातफेरीचे यवतमाळकरांनी ठिकठिकाणी स्वागत केले. ही रॅली दत्त मंदिरापासून सुरू होऊन जयहिंद चौक श्री राम मंदिर येथे संपली. यावेळी जयहिंद चौक व गणपती मंदिर चौकात ५१ फूट उंच भगवा ध्वज फडकविण्यात आला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा