मुंबईतील महालक्ष्मी मंदिराचा घुमट होणार शुद्ध सोन्याचा

मुंबईतील महालक्ष्मी मंदिराचा घुमट होणार शुद्ध सोन्याचा

२६ नोव्हेंबर २००८… मुंबईला हादरवणारा दिवस. दहशतवाद्यांनी मुंबई वेठीस धरली होती. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या थरारक, वेदनादायी, कटू आठवणी आजही प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयांच्या मनात कायम आहेत. संपूर्ण जग या दहशतवादी हल्ल्याने हादरून गेले. ओमानमधील व्यावसायिक एस. पेरियास्वामी यांच्याकडेही या दिवसाच्या कटू आठवणी आहे. दहशतवादी हल्ल्यामुळे नोकरीसाठी परदेशात जाणार असलेल्या पेरियास्वामी यांना विमान उड्डाणे बंद असल्याने पंधरा दिवस मुंबईतच अडकून पडावे लागले. आपली नोकरी तर जाणार नाही अशी धाकधूक यांच्या मनाला लागली होती. मुंबईतील आपली परिस्थिती सुधारावी आणि विदेशात नोकरी मिळावी यासाठी प्रर्थना करण्यासाठी ते मंदिरात जायचे.

महालक्ष्मी आणि महासरस्वती देवींवर त्यांची अपार श्रध्दा होती. त्यांची ही श्रद्धा फळाला आली. ओमानमध्ये एका लहान व्यवसायातून पेरियास्वामी मोठे उद्योजक झाले. त्यामुळेच म्हणजे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती देवीवर अपार श्रध्दा असलेले पेरियासामी यांनी महालक्ष्मी मंदिराच्या घुमटावर १० कोटी रुपये खर्च करून सोन्याने इलेक्ट्रोप्लेट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबईतील प्रसिद्ध मंदिराचा घुमट आता लवकरच शुद्ध सोन्याचा होणार आहे.

वास्तविक २००८ नोकरीसाठी त्यांना ओमानला जायचे होते. ओमानला विमानाने जाण्यासाठी ते मुंबईत आले होते. त्याच दरम्यान २००८ मध्ये दहशतवादी हल्ल्याने हादरली. या बॉम्बस्फोट साखळीचा मोठा फटका मुंबईला बसला होता. त्यामुळे विमाने पुन्हा सुरू होण्यासाठी जवळपास १५ दिवस ते मुंबईतच अडकून पडले होते. मुंबईतील आपली परिस्थिती सुधारावी आणि विदेशात नोकरी मिळावी यासाठी प्रर्थना करण्यासाठी ते मंदिरात जायचे. नोकरी गमावली जाऊ नये या भीतीने पेरियास्वामी यांनी केवळ १२ हजार रुपयांमध्ये काम करण्याचीही तयारी दर्शवली होती.

परिस्थिती सुधारल्यानंतर ते त्यानंतर ते ओमानला निघून गेले आणि काही वर्षांनी पेरियास्वामी यांनी तेथे एक लहान पॉवर ट्रान्सफॉर्मर व्यवसाय सुरू केला जो नंतर एका मोठ्या उद्योजकाने ५०% गुंतवणुकीद्वारे १४ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढला.

खारट समुद्रातील हवेपासून संरक्षण होणार

नवीन घुमट, सोन्याचे इलेक्ट्रोप्लेटेड शुद्ध तांब्याच्या पत्र्याने बनवलेले (मंदिर ट्रस्टने मंजूर केलेले डिझाइन), मंदिराच्या घुमटाच्या सभोवतालच्या गंज नसलेल्या स्टेनलेस-स्टील फ्रेमवर विराजमान आहे. खारट समुद्राच्या हवेमुळे ते खराब होऊ नये म्हणून हे सर्व केले जात आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर

बजरंग दलाने कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयावर लिहिले हज हाऊस

चीनमध्ये बँकिंग संकट; नागरिकांना रोखण्यासाठी बँकांसमोर रणगाडे तैनात

पंतप्रधान मोदींनी घेतली द्रौपदी मुर्मू यांची भेट

प्रकल्पासाठी अंदाजे २५ कोटी रुपये खर्च

१० कोटी रुपयांचा सोन्याचा मुलामा, घुमटाचे बांधकाम आणि मंदिराभोवतीची तांब्याची रचना याशिवाय या प्रकल्पाचा एकूण खर्च अंदाजे २५ कोटी रुपये असेल असा अंदाज आहे.

मुंबई हेरिटेज समितीचीही परवानगी आवश्यक

“ट्रस्टने यापूर्वीच तत्त्वत: मान्यता दिली आहे. सोन्याचा घुमट आज आहे त्याच संरचनेचा असावा, ही एकच पूर्व अट आहे. ती घेतली जाईल. घुमट बांधताना किंवा बांधल्यानंतर सध्याच्या वास्तूला इजा होणार नाही याची विशेष काळजी घयावी लागेल. विश्वस्त मंडळाकडून वेळोवेळी परवानगी घेण्यासोबतच देणगीदाराला मुंबई हेरिटेज कमिटीची परवानगी घ्यावी लागेल असे श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टने म्हटले आहे.

Exit mobile version