अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. दुसरीकडे मंदिराच्या अंतिम टप्प्यातील कामालाही वेग आला आहे. सर्वांच्या नजरेत बसलेलं हे राम मंदिर कोणी डिझाईन केले आहे हा प्रश्नही राम भक्तांच्या मनात आहे. याचं उत्तर आहे सोमनाथ मंदिर, मुंबईतील स्वामीनारायण मंदिर, कोलकाता येथील बिर्ला मंदिर डिझाईन करणारे चंद्रकांत सोमपुरा यांनीच अयोध्या राम मंदिराचे डिझाईन तयार केले. मंदिराचे डिझाईन तयार करणारी ही त्यांची पंधरावी पिढी आहे.
सोमपुरा परिवाराच्या पंधरा पिढ्या हे मंदिरांचे डिझाईन तयार करण्याचे काम करत आहेत. विश्व हिंदू परिषदचे माजी प्रमुख अशोक सिंघल यांनी चंद्रकांत सोमपुरा यांना ३२ वर्षांपूर्वी राम मंदिरासाठी डिझाईन करण्यासाठी संपर्क केला होता. त्यानंतर १९९० मध्येच त्यांनी मंदिराचे डिझाईन तयार केले होते. १९९० मध्ये कुंभ मेळाव्यात साधूसंतानी त्यांनी केले डिझाईनला मान्यता दिली.
त्यानंतर २०२० मध्ये न्यायालयाचा निकाल आल्यानंतर डिझाईनमध्ये काही थोडे बदल करुन आजचे मंदिर उभारले जात आहे. चंद्रकांत सोमपुरा यांनी आतापर्यंत जगभरातील २०० पेक्षा जास्त मंदिराचे डिझाईन तयार करण्याचे काम केले आहे. चंद्रकांत सोमपुरा यांचे अजोबा प्रभाशंकर ओघडभाई यांनी नव्या सोमनाथ मंदिराचे डिझाइन तयार केले होते.
हे ही वाचा:
कुनो नॅशनल पार्कमध्ये मादी चित्ता आशाने ३ शावकांना दिला जन्म!
गुरुग्राममध्ये मॉडेलची हत्या, बीएमडब्ल्यूमध्ये मृतदेह घालून आरोपी पळाले!
ओडिशाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार!
केपटाऊनच्या मैदानात ‘राम सिया राम’ गाणं वाजताच विराट कोहलीने जोडले हात
राम मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या निर्मितीसाठी कुठेही लोखंडाचा वापर केलेला नाही, असे चंद्रकांत सोमपुरा म्हणाले. राम मंदिरासाठी बंसी पहाडपूर येथील गुलाबी दगड आणि बलुआ दगडांचा वापर केला आहे. हजारो वर्षांपर्यंत मंदिराच्या बांधकामाला कसलाही धोका नसणार. बंसी पहाडपूर दगड जितका जुना होतो तितका तो मजबूत होतो, अशीही माहितीही त्यांनी दिली. राम मंदिर निर्माण करण्यासाठी स्टील, लोखंडाचा वापर केला नाही. स्टीलचे आयुष्य कमी असते. त्याला जंगही लागते. यामुळे ८०-१०० वर्षांनंतर त्याची डागडुजी करावे लागते.