तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. धर्मगुरूंचा अयोध्या जाण्याचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. प्रस्तावित कार्यक्रमानुसार, दलाई लामा हे बिहारच्या बोधगयेतून सरळ अयोध्येला जातील. अयोध्येच्या राम मंदिरात २२जानेवारी रोजी रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
या कार्यक्रमासाठी दलाई लामा यांना विश्व हिंदू परिषदेने निमंत्रण पाठवले आहे. दलाई लामा १४ जानेवारी रोजी बिहारमधून मॅक्लोडगंज येथे परतणार होते. सिक्किम आणि पश्चिम बंगालमधील प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर धर्मगुरू बोधगया येथे गेले होते. गेल्या एक महिन्यापासून ते बोधगया येथेच आहेत. आता मात्र ते बोधगयेतूनच अयोध्येला जातील. अशा परिस्थितीत दलाई लामा या महिन्याच्या अखेरपर्यंत मॅक्लोडगंज येथे परतण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा..
लोखंडवाला १२० फुटी डीपी रोडसाठी मुख्यमंत्री सकारात्मक
संसद घुसखोरी प्रकरण: नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंगनंतर प्रकरणाच्या मास्टरमाईंडचे नाव समोर
वडिलांचे नाव नीट न लिहिता येणारे वडिलांचा वारसा कसा चालवणार?
आज मणिपूरपासून सुरू होणार काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा
पर्यटनस्थळ असलेल्या मॅक्लोडगंज येथे देशविदेशांतील पर्यटक आणि बौद्ध अनुयायी दलाई लामा यांच्या दर्शनासाठी येत असतात. गेले काही दिवस दलाई लामा हे हिमाचल प्रदेशच्या बाहेर असल्याने येथील पर्यटकांच्या संख्येत घट झाली होती. दलाई लामा यांच्या उपस्थितीमुळे अनेक परदेशी राजनैतिक अधिकारीदेखील मॅक्लोडगंज येथे नेहमीच येत-जात असतात. तसेच, देशातील विविध राज्यांतील निर्वासित तिबेटी नागरिक, बौद्ध अनुयायी दलाई लामा यांची शिकवण ऐकण्यासाठी येथे येत असतात.