25 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरधर्म संस्कृती२०० कोटींची संपत्ती दान करून दाम्पत्याने स्वीकारली भिक्षुकी

२०० कोटींची संपत्ती दान करून दाम्पत्याने स्वीकारली भिक्षुकी

Google News Follow

Related

गुजरातमधील एका दाम्पत्याने सर्व संपत्तीचा त्याग करून भिक्षुक होण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातमधील हिम्मतनगर येथे राहणाऱ्या व्यावसायिक दाम्पत्याने हा निर्णय घेत आपली तब्बल २०० कोटींची संपत्ती दान केली आहे. त्यांनी जैन धर्मातील आध्यात्मिक मार्ग निवडला आहे. भावेश भंडारी आणि त्यांच्या पत्नीने फेब्रुवारी महिन्यात सर्व धनसंपत्तीचा त्याग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता त्यांनी अधिकृतरित्या सर्व भौतिक सुखांचा त्याग केला आहे.

भंडारी यांच्या दोन्ही मुलांनी यापूर्वीच २०२२ साली भिक्षूक होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता भंडारी दाम्पत्यानेही हा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. २२ एप्रिल रोजी संन्याशी होण्याची शपथ घेतल्यानंतर दाम्पत्याला आपले वैवाहिक संबंध सोडून सर्व भौतिक सुखांचा कायमचा त्याग करावा लागणार आहे. यापुढे ते भारतभर अनवाणी फिरतील आणि या काळात केवळ भिक्षेवर जगतील. भिक्षूक झाल्यानंतर दाम्पत्याला केवळ दोन पांढरी वस्त्रे, भिक्षेसाठी एक वाटी आणि ‘राजारोहण’ बाळगता येणार आहे.

भंडारी दाम्पत्यांसह ३५ जणांची नुकतीच मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत त्यांनी आपले मोबाइल फोन आणि इतर वस्तू दान केल्या. जैन धर्मात दीक्षा घेण्याला एक वेगळे महत्त्व आहे. जिथे भौतिक सुखसोयींशिवाय जीवन जगण्याची कटिबद्धता दाखविली जाते. भिक्षेवर जगून भारतभर अनवाणी चालून धर्मोपदेश केला जातो.

हे ही वाचा:

लोकसभा निवडणुकीपूर्वी ४ हजार ६५० कोटी रुपये जप्त

‘आप’ला आणखी एक धक्का, आ. अमानतुल्ला खान यांचा जामीन अर्ज फेटाळला!

मणिपूर:हिंसाचारात लुटलेली शस्त्रे ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये ठेवा!

तीन षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने चाहत्याला दिली खास भेट

जास्त संपत्ती असूनही त्याचा त्याग केल्यामुळे भंडारी कुटुंब सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. भवरलाल जैन यांनीही याआधी कोट्यवधी संपत्तीचा त्याग करून संन्यास घेत या धर्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला होता. भवरलाल जैन यांनी भारतात सूक्ष्म सिंचनाच्या प्रणालीचा पाया रचला होता. त्यानंतर आता भंडारी कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा