राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश राममय झाला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आहेत. यातलेच एक आहेत, राष्ट्रीय संग्रहालयाचे महासंचालक आणि भारतीय वारसा संस्थेचे कुलपती बी. आर. मणी. ते भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेचे अतिरिक्त महासंचालकही राहिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेच्या ज्या आधारावर निर्णय दिला होता, तो अहवाल मणी यांच्या नेतृत्वाखालील गटानेच दिला होता. ते सांगतात की, सन २००३ मध्ये जेव्हा खोदकाम सुरू झाले, तेव्हा सर्व पुरावे मंदिराचे मिळत होते. मात्र, वादग्रस्त जागेसंदर्भातील बाबरी पक्ष केवळ चुकीचे तर्क मांडत होता. पुरावा न देता दावे फेटाळून लावत होता. उत्खननात अनेक मूर्ती आणि ५० खांब आढळले होते. हे खांब एकाच ओळीत होते. पाणी बाहेर पडण्याचा मार्गही केवळ उत्तर दिशेने होता. हे मुख्यतः मंदिरातच आढळते. बी. आर. मणी यांनी अयोध्याशी संबंधित अशी अनेक तथ्ये समोर आणली आहेत.
अयोध्येमध्ये राममंदिरच होते, यावर शिक्कामोर्तब
१२ मार्च, २००३ रोजी खोदकाम सुरू झाले. तेव्हा पाच ओळींत खांब आढळले. प्रत्येक ओळीत १७ खांब होते. गर्भगृहातील वादग्रस्त ठिकाणी मध्यभागी कोणताही खांब नव्हता. याच जागी रामलल्ला विराजमान होते. अशा तऱ्हेने ८४ खांब येथे असणे अपेक्षित होते. ८४ आणि १०८ हे अंक मंदिरासाठी शुभ मानले जातात. १४ वी शताब्दीतील अयोध्या महात्म्य नावाच्या पुस्तकात ८४ स्तंभाच्या मंदिराचा उल्लेख आढळतो. त्याशिवाय, अनेक मूर्ती आणि सुशोभीत वस्तूही आढळल्या, उदा. पत्रवल्लरी (ज्यात फुले आणि पाने असतात), कपोतपालिका (कबुतरांना पाणी देणारे पात्र), मगरीचे मुख असणारे मकरमुख… ज्यांचा वापर मशिदीचा पाया उभारण्यासाठी केला होता.
हे ही वाचा..
चीनमध्ये भूस्खलन होऊन ४० हून अधिक जण गाडले गेले
पंतप्रधानांकडून मुनई मंदिरात केली प्रार्थना!
राम सिया राम.. अयोध्येला जाणाऱ्या विमानातील लोक राम भजनात नाचून दंग!
अंतराळातून राम मंदिर कसं दिसतं?, इस्रोने पाठवला फोटो!
वादग्रस्त भाग उभारताना विष्णु हरि शिलालेखाचा उपयोग करण्यात आला होता, जो मंदिराचा भाग होता. वादग्रस्त भागाला तोडण्यात आले तेव्हा तिथे तोच शिलालेख मिळाला होता. मर्यादित भागच तोडण्याची न्यायालयाची परवानगी असल्याने त्यांना ५०खांबच मिळाले. संपूर्ण परिसरात खोदकाम केले असते तर, कदाचित सर्व ८४ खांब मिळाले असते, असे मणि यांनी सांगितले.