वर्ल्ड हेरिटेज साईट ठरलेल्या भारतातील मंदिराची काय आहे खासियत?

वर्ल्ड हेरिटेज साईट ठरलेल्या भारतातील मंदिराची काय आहे खासियत?

आपल्या भारताला प्रचंड मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. या प्राचीन अशा भारतीय संस्कृतीतील अनेक वास्तू अशा आहेत ज्या साऱ्या जगाला भुरळ पाडतात. जगभरातील अशा प्रकारचा सांस्कृतिक वारसा लाभलेल्या स्थळांना युनेस्को या जागतिक संघटनेमार्फत ‘हेरिटेज साईट’ म्हणून घोषित करण्यात येते. नुकत्याच अशा काही स्थळांना युनेस्कोने ‘हेरिटेज साईट’ असा दर्जा दिला आहे. या मध्ये भारतातील एका प्रसिद्ध मंदिराचा समावेश करण्यात आला आहे.

हे प्रसिद्ध मंदिर दक्षिणेतील तेलंगणा या राज्यात वसलेले आहे. हे मंदिर म्हणजे काकतीय रुद्रेश्वर मंदिर! ही वस्तू तेलंगणातील पहिली ‘हेरिटाईज साईट’ ठरली आहे. काकतीय रुद्रेश्वर हे रामप्पा मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. हे भगवान महादेवाचे मंदिर आहे. तेलंगणा भागात जेव्हा काकतीयन घराण्याचे साम्राज्य होते, तेव्हा हे साम्राज्यातील मुख्य मंदिर होते.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही

आता ‘हा’ भारतीय खेळाडू कोरोना पॉसिटीव्ह

मिराबाई चानूला मणिपूर सरकारकडून ही भेट…

एवढा ‘ज्यू द्वेष’ की ऑलिम्पिकचंही महत्व नाही

काय आहे या मंदिराची वैशिष्ट्ये?
हैदराबाद पासून २०० किलोमीटरवर ईशान्येस असणाऱ्या पालमपेट या गावी रामप्पा मंदिर वसलेले आहे. या मंदिराचे बांधकाम ८०० वर्षांपेक्षाही प्राचीन आहे. १२१३ साली या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि पुढील ४० वर्ष हे बांधकाम सुरु असल्याचे म्हटले जाते. या मंदिराच्या बांधकामावर अतिशय बारकाईने काम करण्यात आले आहे. या मंदिराच्या खांबांवर आणि भिंतींवर खूप कलात्मक पद्धतीने करण्यात आलेले शिल्पकाम दिसते. यातून काकतीय संस्कृतीचे आणि पारंपरिक नृत्यप्रकारांचे दर्शन होते.

Exit mobile version