संभलमध्ये सापडले महादेव, हनुमानाचे मंदिर; ४६ वर्षांपासून होते बंद

एक विहीरही आढळून आली असून विहीर खुली करण्याचे कामही सुरू

संभलमध्ये सापडले महादेव, हनुमानाचे मंदिर; ४६ वर्षांपासून होते बंद

उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यात तब्बल ४६ वर्षांनंतर मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रशासनाने शनिवार, १४ डिसेंबर रोजी संभलमधील शाही जामा मशीद परिसरात अतिक्रमण आणि वीज चोरीविरोधात धडक मोहीम राबवली आहे. यावेळीच या भागातील एक मंदिर बंद असल्याचे समोर आले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर हे मंदिर उघडण्यात आले. मंदिराची साफसफाई सुरू केली असता, यावेळी एक विहीरही आढळून आली. विहीर खुली करण्याचे कामही सुरू आहे. हे मंदिर रस्तोगी कुटुंबाचे कुलगुरू असल्याचे सांगितले जाते. लोकांचा दावा आहे की आसपासच्या भागात आणखी बरीच मंदिरे ताब्यात घेण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी याच भागात हिंसाचार उसळला होता.

संभलमधील शाही जामा मशीद परिसरातील अतिक्रमणे हटवून वीजचोरी रोखण्यासाठी कडक कारवाई सुरू आहे. परिसरातील रस्ते आणि नाल्यांवरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश प्रशासनाच्या पथकाने दिले आहेत. याचंवेळी महमूद खा सराय भागातील एका बंद घरात मंदिर असल्याचे लक्षात आले. येथे १९७८ मध्ये झालेल्या जातीय दंगलीनंतर हे घर बंद होते. यानंतर हे घर विकले आणि तेव्हापासून ते बंद होते. जिल्हाधिकारी राजेंद्र पेन्सिया आणि पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिश्नोई यांच्या देखरेखीखाली मंदिराची स्वच्छता करण्यात आली. घराच्या मालकीबाबत तपास सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डीएम पेन्सिया यांनी दिली.

हे ही वाचा : 

“विधानसभेत पराभूत झालेले उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा धरत स्टंटबाजी करतायत”

‘ओपनएआय’वर प्रश्न उपस्थित करणारे सुचीर बालाजी कोण होते?

‘स्टॅचू ऑफ युनिटी’चे शिल्पकार राम सुतार सिंधुदुर्गात उभारणार महाराजांचा पुतळा

‘ओपनएआय’वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुचीर बालाजी यांचा अमेरिकेत आढळला मृतदेह

शनिवारी जामा मशीद परिसरात वीजचोरीविरोधात मोहिमेदरम्यान ४६ वर्षांपासून बंद असलेले शिव आणि हनुमानाचे मंदिर सापडले. मंदिरावर अतिक्रमण करून त्याचे घरात रूपांतर करण्यात आले होते. प्रशासनाने मंदिराची स्वच्छता करून घेतली असून अतिक्रमणांवर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

Exit mobile version