‘संस्कारी, देशप्रेमी, सुदृढ बाळ हवंय, मग रामायण वाचा’

तेलंगणाच्या राज्यपालांनी केले आवाहन

‘संस्कारी, देशप्रेमी, सुदृढ बाळ हवंय, मग रामायण वाचा’

गर्भवती महिलांनी ‘सुंदरकांड’चा जप करावा आणि मानसिक व शारीरिकदृष्ट्या सुदृढ बाळ होण्यासाठी रामायणासारखे महाकाव्य वाचावे, असे तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी रविवारी सांगितले. आरएसएसशी संबंधित असलेल्या संस्थेच्या ‘गर्भसंस्कार’ कार्यक्रमाचा शुभारंभ करताना स्त्रीरोगतज्ज्ञ आणि गर्भ थेरपिस्ट सौंदर्यराजन यांनी हे भाष्य केले.

संवर्धिनी न्यासने विकसित केलेल्या ‘गर्भ संस्कार’ कार्यक्रमांतर्गत, संस्थेशी संबंधित डॉक्टर गर्भवती मातांना ‘वैज्ञानिक आणि पारंपरिक’ उपचार देणार आहेत, जेणेकरुन त्या ‘संस्कारी आणि देशभक्त’ बाळांना जन्म देतील. ‘गर्भ संस्कार’ उपचार पद्धतीमध्ये भगवद्‌गीता, संस्कृत मंत्रांचा जप आणि योगाभ्यास यासारख्या धार्मिक ग्रंथांचे वाचन यांचा समावेश असेल. गर्भधारणेपूर्वीपासून ते प्रसूतीच्या टप्प्यापर्यंत ही प्रक्रिया सुरू होईल आणि बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत सुरू राहील. कार्यक्रमादरम्यान गरोदर मातांच्या कुटुंबातील सदस्यांनाही मार्गदर्शन केले जाईल. ‘संवर्धिनी न्यास’ ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिलांच्या राष्ट्र सेविका संघाची शाखा आहे.

हे ही वाचा:

मुंबईत पावसाची हजेरी, राज्यात येलो अलर्ट जारी

बॅडमिंटन खेळल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने खेळाडूचे निधन

फॉर्च्युनर गाडीच्या शर्यतीच्या नादात दांपत्याचा गेला जीव, मुलगा गंभीर जखमी

गेमिंग ऍप धर्मांतरण प्रकरणी फरार शाहनवाजला पकडले

या गर्भसंस्कार उपक्रमाचा आभासी पद्धतीने शुभारंभ करण्यात आला. सौंदर्यराजन यांनी ‘गर्भ संस्कार’ कार्यक्रम विकसित करणार्‍या संवर्धिनी न्यासच्या प्रयत्नांचे कौतुक केले. ‘गर्भधारणेसाठी आवश्यक अशा वैज्ञानिक आणि सर्वांगीण दृष्टिकोनाच्या अंमलबजावणीमुळे निश्चितपणे सकारात्मक परिणाम मिळतील’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘खेड्यापाड्यांत आपण गरोदर मातांना रामायण, महाभारत आणि इतर महाकाव्ये तसेच, चांगल्या कथा वाचताना पाहिले आहे.

विशेषत: तामिळनाडूमध्ये असे म्हटले जाते की, गर्भवती महिलांनी रामायणातील सुंदरकांड शिकावे. गरोदरपणात ‘सुंदरकांड’चा जप करणे बाळांसाठी खूप चांगले असते,’ असे त्या म्हणाल्या. ‘सुंदरकांड’ हा ‘रामायण’मधील एक अध्याय आहे, ज्यात भगवान हनुमानाचे साहस आणि रामावरील त्यांची भक्ती दर्शविली आहे. संवर्धिनी न्यासशी संबंधित डॉक्टरांद्वारे देशभरात ‘गर्भ संस्कार’ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे मार्गदर्शन व देखरेख करण्यासाठी आठ सदस्यीय केंद्रीय पथक तयार करण्यात आले आहे.

Exit mobile version