डॉक्टर तुषार सावडावकर लिखित ‘तेजोवलयाचे रहस्य’ या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले आहे. शुक्रवार, २९ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध उद्योजक आणि ‘न्यूज डंका’ चे मार्गदर्शक प्रशांत करुळकर यांच्या हस्ते, तर ‘न्यूज डंका’ चे मुख्य संपादक दिनेश कानजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकातून ‘तेजोवलयाचे रहस्य’ मराठीतून उलगडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यावेळी सौ.शीतल करुळकर देखील उपस्थित होत्या.
इंग्रजीत ज्याला ‘ऑरा’ म्हणतात अशी तेजोवलय ही संकल्पना आपल्या भारतीय ऋषीमुनींनी जगाला दिलेली देणगी आहे. या ज्ञानाला विज्ञानाची जोड देऊन परदेशी शास्त्रज्ञांनी ऑरा म्हणजेच तेजोवलय शोधणारी अनेक उपकरणे शोधली ज्याच्या साहाय्याने तेजोवलयाचे मोजमाप करणे शक्य आहे. यावर गेली अनेक वर्ष डॉ. साडगावकर हे संशोधन करत आहेत. त्यावरूनच त्यांनी या विषयावरचे आपले नवे पुस्तक वाचकांच्या भेटीला आणले आहे.
हे ही वाचा:
‘कुणाचा नवरा हिंदू की मु्स्लिम याचे नवाब मलिक आणि मीडियाला काय देणेघेणे?’
‘युवराजांचे बाबा झाले ‘एसटी’ कामगरांचे यमराज’
वैद्यकीय शाखेत अल्टर्नेटीव्ह मेडिसिनचे एम डी पर्यंत शिक्षण घेतलेले डॉ. साडगावकर हे गेले ३० वर्षांपेक्षा अधिक काळ ज्योतिष शास्त्र, वास्तू शास्त्र या क्षेत्रात कार्यरत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी या विषयांशी संबंधित त्यांनी विविध पुस्तके लिहिली आहेत. यामध्ये आदर्श घराची संकल्पना, वास्तुसहस्र लेखावली, क्रिस्टल आणि विविध उपचार पध्दती, कृष्णमूर्ती ज्योतिष पध्दतीचा श्रीगणेशा – भाग 1 अशा पुस्तकांचा समावेश आहे. यात आता तेजोवलयाचे रहस्य या नव्या पुस्तकाची भर पडली आहे.