दिल्लीतील जेएमडी कोचिंग क्लासेसमध्ये कुराण वाचण्यास आणि त्यानंतर कलमा पढण्यास सांगितले जात असल्याचा आरोप करत मनोज कुमार यांनी दिल्लीतील शकुरपूर येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मनोज यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा १३ वर्षांचा मुलगा आहे. त्याने मला विचारले की कुराण म्हणजे काय, तसेच त्यानंतर कलमा पढणे म्हणजे काय. यावर मनोज कुमार यांनी अधिक चौकशी केली तेव्हा मुलगा म्हणाला की, त्याच्या कोचिंग क्लासमधील त्याचे शिक्षक त्याला इस्लाम आणि त्याच्या शक्तीविषयी सांगत असतात. मनोज म्हणाले की, कोचिंग क्लासमधील शिक्षक रिझवान, अबसार आणि इरफान यांनी मुलाला कुराण वाचण्याची सक्ती केली. शिवाय, कलमा पढण्याचीही ते सक्ती करत होते. तसेच हिंदू धर्म हा मूर्खपणा आहे, असेही बिंबविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तुमच्या धर्मातील देवीदेवतांमध्ये कोणतीही शक्ती नाही, असेही ते सांगत असत. त्यामुळे आता कुराण वाचण्यास सुरुवात कर, कलमा पढ कारण इस्लाममध्ये खूप ताकद आहे. तुलाही त्यामुळे खूप शक्ती मिळेल, असे ते सांगत असत.
मनोज कुमार म्हणाले की, मी याची खूप गंभीर दखल घेतली. त्यानंतर मी कोचिंग क्लासमध्ये फोन करून याबाबत विचारणा केली. मी एका महिला शिक्षकाशी बोललो तेव्हा त्यांनी रिझवान यांच्याकडे फोन दिला. मी त्यांना विचारणा केली की, तुम्ही मुलाला कलमा पढण्यासाठी का सांगत आहात, तर तो संतप्त झाला आणि मला अपशब्द वापरले. बघून घेईन, मी दाऊद इब्राहिमचा बाप आहे. मी तुमच्या कुटुंबालाही बघून घेईन असे रिझवान म्हणाला. दुसऱ्या दिवशी भेटण्यासाठी मी त्याला सांगितले तेव्हाही त्याने माझ्या कुटुंबाला धमकी दिली.
हे ही वाचा:
रत्नागिरीतील गोहत्या बंद करा…संतप्त हिंदू समाजाचा मोर्चा !
महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य!
देवगिरी किल्ला परिसरातील भारतमातेच्या दर्शनाला बंदी नाही
राज्यात नव्याने १० हजार गावांमध्ये हवामान केंद्राची उभारणी करणार
ऑर्गनायझरच्या पत्रकार सुभी विश्वकर्मा यांनी यासंदर्भात पोस्ट करून दिल्ली पोलिसांनी कोणताही एफआयआर नोंदविलेला नाही, असे म्हटले आहे.
अशाप्रकारची ही पहिलीच घटना नाही. २०२३मध्ये अशाच एका घटनेत दोन व्यक्तींमधील टेलिफोनवरील संवाद ऐकायला मिळाला. त्यात एक पालक शिक्षकांवर आरोप करतात की, मुलांना हिंदू राजांबद्दलचा इतिहास शिकवला जात नाही आणि केवळ मुस्लिम राजांच्या इतिहासाकडेच लक्ष दिले जाते. मुलांना महाराणा प्रताप यांच्याबद्दल माहिती दिली जात नाही. आपल्या आईवडिलांना अम्मी अब्बू बोलण्यास मुलांना सांगितले जाते.