रामायण, महाभारत काल्पनिक असल्याचे धडे दिल्यानंतर बंगळूरूमध्ये शिक्षिकेचे निलंबन

भाजपा आमदारांनी केले आरोप; दक्षिण पंथीय समूहाकडून आंदोलन

रामायण, महाभारत काल्पनिक असल्याचे धडे दिल्यानंतर बंगळूरूमध्ये शिक्षिकेचे निलंबन

रामायण आणि महाभारत काल्पनिक आहे असं शिकवणाऱ्या एका शिक्षिकेला निलंबित करण्यात आलं आहे. बंगळूरू येथे ही घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी अपमानजनक वक्तव्य केल्याचाही आरोप या शिक्षिकेवर करण्यात आला आहे. भाजपा आमदारांनी या शिक्षिकेवर केलेल्या आरोपानंतर शाळेने शिक्षिकेला निलंबित केलं आहे.

बंगळुरु येथील सेंट गेरोसा इंग्लिश एचआर प्रायमरी शाळेत ही घटना घडली. रामायण आणि महाभारत काल्पनिक आहे, असं या शिक्षिकेने सांगितले. त्यानंतर या शाळेतल्या शिक्षिकेविरोधात असाही आरोप आहे की, २००२ च्या गोध्रा दंगलींचा उल्लेख करत आणि बिल्किस बानो प्रकरणाचा उल्लेख करत या शिक्षिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्यं केली.

या शिक्षिकेविरोधात दक्षिण पंथीय समूहाने आंदोलन केले. शिक्षिकेने लहान मुलांच्या मनात तिरस्काराची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही या शिक्षिकेविरोधात आंदोलन करत आहोत, असं दक्षिण पंथीय समूहाने सांगितलं. आम्हाला आता भाजपाची साथ लाभली आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्यावेळी शिक्षिकेला निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर या शिक्षिकेचं निलंबन करण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

राज्यात माघी गणेशोत्सवाचा आनंद

राष्ट्रीय लोक दलाचा ‘इंडी’ला रामराम; ‘एनडीए’ला देणार साथ

माकड टोपी गँगला अटक; घाटकोपरमधील एका ज्वेलर्सला करणार होते लक्ष्य

अशोक चव्हाणांनी मविआचा कार्यक्रम केला

या प्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाते आहे. शाळेने या शिक्षिकेने जे वक्तव्य केल्याचा आरोप केलाय त्यावरुन शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. शाळेने असंही म्हटलं आहे की सेंट गेरोसा शाळेच्या ६० वर्षांच्या इतिहासात अशी कोणतीही घटना घडलेली नाही. या घटनेमुळे मात्र एक प्रकारचा अविश्वास समाजात निर्माण झाला आहे. आम्ही पुन्हा एकदा नव्याने समाजात आमच्याबाबतचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करु. तसंच सगळ्यांच्या भल्यासाठी आणखी चांगल्या पद्धतीने काम करु, असं शाळेने म्हटलं आहे.

Exit mobile version