जळगावात सर्वात उंच महागणपती

महाराष्ट्रातले एकमेव भव्य मंदिर

जळगावात सर्वात उंच महागणपती

जगातील सर्वात भव्य मूर्ती स्टॅच्यू ऑफ युनिटी आता आपल्या देशाची आणखी एक ओळख आहे. शेगाव, शिर्डी आणि सिद्धिविनायक प्रमाणे आता सर्वात उंच बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जळगावात  करण्यात आली आहे. जळगांव जिल्ह्यांतील पाळधी गावाबाहेर श्री सिद्धीवेंकटेशाचे देवस्थान असून श्रीसिद्धिमहागणपती असं भव्य देवस्थान उभारण्यात येत आहे.

तब्बल ३१ फूट उंचीच्या या श्रीगणेश मूर्तीची आजच्या संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. तब्बल ३७४ टन वजनाच्या एकाच अखंड काळ्या पाषाणात ही भव्य ३१ फूट उंचीची हि मूर्ती साकारली असून १६ दिवस याची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. जळगावात सर्वात उंच महाकाय गणपतीची आज प्राणप्रतिष्ठा जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाबाहेर श्री सिद्धी महागणपती असे या तीर्थक्षेत्राचे नाव आहे. श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानचे विश्वस्त श्रीकांत मणियार यांनी हे  असं भव्य हे मंदिर साकारत आहे.

शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने या सिद्धी महागणपतीच्या प्राणप्रतिष्ठेला आजपासून सुरुवात झाली आहे. तब्बल १६ दिवस चालणाऱ्या या प्राणप्रतिष्ठेला नऊ अग्निकुंडांमध्ये तब्बल दोन लाख ५१ हजार आहूती अर्पण करण्यात येणार आहेत. या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी राजस्थान , काशी अशा वेगवेगळ्या राज्यातून महापंडित येणार आहेत. या महापंडितांच्या हस्ते, नांदीश्राद्ध, गणपती मातृका पूजन , दशविध स्नान हवं, नित्य आराधना , जल यात्रा आणि अभिषेक करण्यात येणार असून बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहेत.

हे ही वाचा:

अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप

श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात

पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद

आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला

या महाकाय गणपती बाप्पाच्या मूर्तीसाठी खास त्याच्या देवालयात थोडी थोडकी नाही तर तब्बल २०० किलोची घंटा याठिकाणी असणार आहे. ही विशालकाय मूर्ती आणण्यासाठी मुंबईवरून खास क्रेन मागवण्यात आली होती. ही मूर्ती पहिली स्थापित करून नंतर त्याभोवताली मंदिर साकार करण्यात  येत  आहे. तर दुसरीकडे याठिकाणी मूर्ती झाकण्यासाठी खास लोखंडी दरवाजे तयार करण्यात आले. ते दरवाजे सुद्धा देशातील उंच दरवाजे असून त्याची जगातील विक्रमांत नोंद होणार असल्याचे श्रीकांत मणियार जे ह्या मंदिराचे मुख्य आहेत त्यांनी सांगितले.

आता आपल्या राज्यांत सर्वांचा आवडता बाप्पा एवढ्या भव्य प्रमाणांत विराजमान होणार असल्यामुळे सगळ्याच भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आपल्याकडे मुळातच देवस्थानांना विशेष महत्व आहे त्यात हा सगळ्यांचाच लाडका बाप्पा असल्यामुळे याचे विशेष महत्व आणि उत्सुकता पसरली आहे.

Exit mobile version