भाविकांच्या दानधर्मातून श्रीकृष्णासाठी २५ लाखांचा पाळणा

या पाळण्यात सुमारे ७ किलो चांदी आणि २०० ग्रॅमहून अधिक सोन्याचा वापर करण्यात आला आहे

भाविकांच्या दानधर्मातून श्रीकृष्णासाठी २५ लाखांचा पाळणा

श्रीकृष्णाची जयंती संपूर्ण भारतात वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. अशा परिस्थितीत आज जन्माष्टमीचा सण संपूर्ण भारतात साजरा होत आहे. गुजरातमधील वडोदरा येथून एक अनोखा प्रकार समोर आला आहे. येथील एका मंदिरामध्ये श्रीकृष्णासाठी २५ लाख रुपये किमतीचा पाळणा तयार करण्यात आला आहे. या अनमोल पाळण्याचे फोटो व्हायरल होत असून ते सोन्या-चांदीपासून तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हा पाळणा भाविकांनी केलेल्या दानधर्मातून बनविण्यात आला आहे. याची किंमत २५ लाखांच्या घरात असल्याचे मंदिर प्रशासनं म्हटलं आहे.

वडोदरा येथील एका मंदिरात हा पाळणा बसवण्यात आला असून त्यात सुमारे ७ किलो चांदी आणि २०० ग्रॅमहून अधिक सोन्याचा वापर करण्यात आला आहे. दान केलेल्या रकमेतून सोने आणि चांदीची खरेदी करण्यात आली आहे. खरं तर, सोन्या-चांदीचा हा पाळणा बनवण्यासाठी बराच वेळ लागल्याचे मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे आणि त्यासाठी देणगीतून रक्कम उभारण्यात आली आहे. हा पाळणा पाहण्यासाठी सध्या भाविकांची गर्दी होत आहे. मंदिरात हा पाळणा दिसत आहे.

हे ही वाचा:

कसे करावे शिवलीलामृत पारायण ?

हरिहरेश्वर येथे अज्ञात बोट आणि एके ४७ सापडल्याने खळबळ

‘भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच म्हणायचे आमचा गड’

रोहिंग्यांचा पुळका मोदींचा दणका

गुजरात हे भारतातील अशा राज्यांपैकी एक आहे, जिथे जन्माष्टमीची वेगळीच चमक असते. खरे तर येथे अनेक ठिकाणी श्री कृष्णाच्या रासलिलाचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्याच बरोबर हे राज्य द्वारकाधीश सारख्या मोठ्या मंदिरासाठी देखील प्रसिद्ध आहे. कोविडच्या दोन वर्षानंतर कृष्ण जन्माष्टमीनिमित्त गुजरातमधील लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. गुजरातमधील मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. दरम्यान, गुजरातमधील द्वारकाधीश मंदिरात कृष्ण जन्माष्टमीनिमित्त लोकांमध्ये उत्साह आहे. या मंदिरात दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. द्वारकाधीश मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव जोरात सुरू आहे.

Exit mobile version