31 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरधर्म संस्कृतीस्वामी गोविंद देव गिरी महाराजांच्या हस्ते होणार हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळाव्याचे...

स्वामी गोविंद देव गिरी महाराजांच्या हस्ते होणार हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळाव्याचे उद्घाटन

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राहणार उपस्थित

Google News Follow

Related

हिंदू आध्यात्मिक एवं सेवा संस्थानच्या वतीने ९ ते १२ जानेवारी या कालावधीत भव्य हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ९ जानेवारीला स्वामी गोविंद देव गिरी महाराज, देवेंद्र ब्रह्मचारी, मैत्रेय दादाश्रीजी यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. मूल्यवर्धन म्हणजेच राष्ट्रनिर्माण हे या कार्यक्रमाचे बोधवाक्य आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर मैदान, लक्ष्मी पार्क, बांगुर नगर, महाराजा अग्रसेन मार्ग, गोरेगाव (प), मुंबई ४००१०४ येथे हा मेळावा भरणार आहे.

सकाळी ९.३० वाजता या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. त्यावेळी अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योगपती संजय डांगी असतील. विशेष अतिथी पृथ्वीराज कोठारी तर सन्मानीय अतिथी जायन्ट्स वेल्फेअर फाऊंडेशनच्या शायना एनसी असतील, अशी माहिती या मेळाव्याचे सचिव अमरनाथ शर्मा यांनी दिली. ‘न्यूज डंका’ या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर आहे.

मूल्य निर्माण से ही राष्ट्रनिर्माण कार्यक्रमाची प्रस्तुती प्रसिद्ध कवी मनोज मुंतशीर शुक्ला करणार आहेत. हा कार्यक्रम सायंकाळी ७.३० वाजता सुरू होईल. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मेला संरक्षक शारदा रामप्रकाश बुबना असतील. तर अध्यक्ष दीनबंधू जालान तर सन्मानिय अतिथी अनिल अग्रवाल, कमल सोमाणी, ओमप्रकाश चमडिया असतील.

हे ही वाचा:

दिल्ली विधानसभा निवडणूक: ५ फेब्रुवारीला मतदान; ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी

पत्रकार हत्या: मुख्य आरोपी सुरेश चंद्राकरचे काँग्रेसशी असलेले संबंध लपविण्याचा प्रयत्न

अबब ! नितीन गडकरींनी करून दिला १२०० कोटींचा नफा!

नागपुरात एचएमपीव्हीची दोन मुलांना लागण

इतर कार्यक्रम दुपारी २.१५ ते ४.१५ या वेळेत होतील. त्यात चित्रकला व संगीत स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष गोएंका असून मुख्य अतिथी सुरेश पूनमिया व सन्मानीय अतिथी श्रीधर गुप्ता, पवन सिंघल, राजेंद्र डालमिया, विनोद गोयल हे असणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता श्री गणपती अथर्वशीर्ष व सायंकाळी ६.३० ला गंगा आरती होईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा