राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांचे एक वक्तव्य आता चांगलेच चर्चेत आहे. सुप्रिया सुळे यांनी पिंपरी चिंचवड येथे झालेल्या पत्रकारांच्या राष्ट्रीय अधिवेशनात हे वक्तव्य केले आणि त्याची चांगलीच चर्चा सुरू झाली.
सुप्रिया सुळे यांनी या अधिवेशनात पत्रकारितेविषयी आपली मते मांडली. त्यात त्यांनी मराठी पत्रकारितेत विविध वाहिन्यांवर दिसणाऱ्या पत्रकार मुली या साडी का नेसत नाहीत, असा सवाल उपस्थित केला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, साडी नेसणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे मग मुली साडी का नेसत नाहीत. शर्ट आणि ट्राउजर का घालतात. सगळीकडे आत्मनिर्भर भारत होत असताना आत्मनिर्भर महाराष्ट्र का करता येत नाही.
हे ही वाचा:
रात्रंदिन आम्हा दुग्धाचा प्रसंग ! मदर डेअरीने केली भाववाढ
मोदी हे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक आहेत, आम्ही कुणावरही नियंत्रण ठेवत नाही
ऍमेझॉनवर पैसे भरले पण सामना आधी दिसतो दूरदर्शनवर
‘ट्रान्सजेंडर डे’ च्या दिवशी अमेरिकेत क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार
सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यावरून आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या अर्ध्या तासाच्या भाषणातील ते वक्तव्य वेगळे काढून ते शेअर केले गेले. शिवाय, सुप्रिया सुळे यांचे शर्ट आणि ट्राउजरमधील जुने छायाचित्र काढून त्यावरूनही त्यांच्यावर टीका करण्यात आली.
याआधी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे यांनी एका पत्रकाराला टिकली लावून ये मग मी तुझ्याशी बोलेन असे म्हटले होते, त्यावरून महाराष्ट्रात हलकल्लोळ माजला होता. भिडे कसे मागासलेले आहेत, इथपर्यंत टीका करण्यात आली. सुप्रिया सुळे यांनीही यावरून भिडे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळेच आज जेव्हा त्या पत्रकारांनी साडी नेसावी असा सल्ला देतात, तेव्हा त्यांना लोक याच टिकलीप्रकरणाची आठवण करून देत आहेत. मग पत्रकारांनी काय घालावे, काय घालू नये हे त्यांना ठरवू द्या असे सुप्रिया सुळे यांना का वाटत नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात येत आहे.