मंदिरांमध्ये हिंदूंच्या आराध्याला अर्पण करण्यात येणारा प्रसाद हा सात्विक आहे की नाही याची आता तपसणी केली जाणार आहे. भाविकांचे आणि हिंदू धर्माचे पावित्र्य भंग होऊ नये यासाठीच आता हिंदुत्ववादी संघटना एकटवल्या आहेत. यासाठी ‘ओम प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आली असून प्रसादाचे पावित्र्य राखण्यासाठी ‘ॐ प्रमाणपत्र’ देण्यात येणार आहे. या ओम प्रमाणपत्राला धर्माचार्यांचा शुभ आशीर्वाद लाभला आहे. तसेच ओम प्रमाणपत्राला हिंदुत्ववादी संघटनांनी समर्थन देत या चळवळीचे मजबुतीकरण केले आहे.
पंचदशनाम नागा संन्यासी, आनंद आखाडा त्र्यंबकेश्वर, स्वामी शंकरानंद महाराज; आखाडा परिषद सचिव, महंत गिरिजानंद महाराज; कोषाध्यक्ष, महंत गिरी महाराज, महंत अनिकेतशास्त्री यांनी ‘ओम प्रतिष्ठान’चे अध्यक्ष रणजीत सावरकर यांना समर्थन देत ‘ॐ प्रमाणपत्रा’ला शुभाशीर्वाद दिले आहेत. या चळवळीची सुरुवात नाशिकमधील श्री त्र्यंबकेश्वर मंदिरापासून होणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले धार्मिक केंद्र आहे. येथे देशभरातून हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. या चळवळीची सुरुवात १४ जून २०२४ रोजी सकाळी सकाळी १० वाजता त्र्यंबकेश्वर मंदिरासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून होणार आहे.
प्रसादाचे पावित्र्य राखण्यासाठी या चळवळीला हिंदुत्ववादी संघटनांनी पाठींबा दिलेला आहे.
- पुरोहित संघ.
- आखाडा परिषद.
- पंचायती तपोनिधी आनंद आखाडा, दशनाम नागा संन्यासी.
- सनातन वैदिक धर्म सभा.
- श्रीपंचायती आखाडा बडा उदासीन निर्वाण.
- अखिल भारतीय संत समिति,धर्म समाज.
- पंचमुखी हनुमान व रामचंद्र मंदिर ट्रस्ट.
- श्रीसाई किरण धाम, रामतीर्थ.
- हनुमान जन्मस्थान, अंजनेरी.
- महाराष्ट्र मंदिर महासंघ.
- सकल हिन्दू समाज.
- मंदिर समिती, नाशिक
- स्वामी समर्थ केंद्र, त्र्यंबकेश्वर
मंदिरांमध्ये भाविकांकडून त्यांच्या श्रद्धास्थानाला जो प्रसाद अर्पण केला जातो त्या प्रसादात अनेकदा वर्ज्य आणि अपवित्र पदार्थ मिसळले जात असल्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत. यामुळे हिंदू धर्मियांच्या आस्थेला धक्का लागत आहे. भाविकांची आस्था जपण्यासाठी आणि हिंदू धर्माचे हे पावित्र्य भंग होऊ नये यासाठीच आता हिंदुत्ववादी संघटनांनी कंबर कसली आहे. धार्मिक आस्थांशी निगडीत असलेला प्रश्न सोडविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना एकटवल्या आहेत.
हे ही वाचा:
डोडामध्ये लष्करी तळावर हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध
जगन्नाथपुरी मंदिराचे सर्व दरवाजे आज उघडणार
भारत विरुद्ध चित्तथरारक सामन्यात अमेरिककडून चूक; पाच धावांची पेनल्टी
अमेरिकेला पराभूत करून भारताची सुपर आठमध्ये धडक
प्रसाद विकणाऱ्या दुकानांना ‘ओम सर्टिफिकेट’ दिले जाणार आहे. हिंदूंच्या आराध्याला अर्पण करण्यात येणारा प्रसाद हा सात्विक आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे. प्रसादात वापरल्या जाणाऱ्या पदार्थामध्ये अशुद्ध घटक वापरले जात नाहीत ना याची खात्री केली जाणार आहे. सर्व योग्य पद्धतीने सुरू असल्यास संबंधितांना ‘ओम सर्टिफिकेट’ दिले जाणार आहे. यामुळे भाविकांच्या श्रद्धास्थानाला आणि श्रद्धेला ठेच पोहचणार नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकचे कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, अखिल भारतीय संत समिती धर्म समाजचे महाराष्ट्र प्रदेशचे महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेत शास्त्री महाराज यांनी पुढाकार घेत ही चळवळ सुरू केली आहे.