24 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरधर्म संस्कृती'दोन बहिणीचं एकाच मुलाशी लग्न म्हणजे हिंदू संस्कृतीला काळिमा'

‘दोन बहिणीचं एकाच मुलाशी लग्न म्हणजे हिंदू संस्कृतीला काळिमा’

खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला आहे.

Google News Follow

Related

मुंबईतील दोन जुळ्या बहिणींशी एकाच तरुणाने विवाह केल्याची घटना सोलापुरात घडली आहे. सोशल मीडियावर या लग्नाचा व्हडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर या जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा मुद्दा खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत उपस्थित केला आहे.

जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाशी विवाह केल्याची घटना ही हिंदू संस्कृतीला डाग असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रातील सोलापुरात एका घटनेने हिंदू संस्कृतीला डाग लावण्याचं काम केले आहे. देशात कलम ४९५ आणि ४९५ लागू असताना एका तरुणाने दोन तरुणींशी विवाह केला आहे. मात्र, यासाठी देशात कायदा बनवण्याची गरज आहे. तसेच, हा विवाह करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राणा यांनी केली आहे.

सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी नियम, कायदे करायला हवेत. तसेच, सोलापुरात असे लग्न करणाऱ्या तरुणालाही दंडित करायला हवे. यामुळे येणाऱ्या काळात संस्कृतीला धक्का लागेल, असंही नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, रिंकी आणि पिंकी या दोन्ही बहिणी आयटी कंपनीत नोकरीस आहेत. दोघींचे शिक्षणही एकत्र झालेले आहे. जुळ्या असल्यामुळे एकत्रच त्यांचे संगोपन झाले. एकमेकांची त्या दोघींनी इतकी सवय आहे की, त्यांनी एकाच वराशी विवाह करण्याचे ठरविले. दोघी एकमेकांशिवाय राहू शकत नसल्याने त्या वेगवेगळे विवाह करण्यासही तयार नव्हत्या त्यामुळे त्यांनी अतुल या वराशीच लग्न केले आहे.

हे ही वाचा:

माजी राष्ट्राध्यक्ष कॅस्टिलो यांना तुरुंगात टाकल्यानंतर पेरूमध्ये आणीबाणी

अमित शहांचा सल्ला, ‘सीमाभागावर दावे नकोत’

धक्कादायक! दहा ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन

श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारची समिती

मात्र, या प्रकरणात चौकशी करण्याची पोलिसांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली होती. तक्रारदार हा कुटुंबातील सदस्य तसेच रक्ताच्या नात्यातील नाही, असे कारण न्यायालयाने दिले होते. परंतु आता लोकसभेत हा प्रश्न उपस्थित झाला असल्याने पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा