बांगलादेशात सत्तापालट झाल्यापासून अल्पसंख्यांक विशेषतः हिंदुंवरील हल्ले सुरूचं आहेत. सातत्याने हिंदू मंदिरांनाही लक्ष्य केले जात आहे. याशिवाय हल्ल्यांविरोधात आवाज उठवणाऱ्यांनाही टार्गेट केले जात आहे. चिन्मय कृष्ण दास प्रभू यांच्यासह इस्कॉनशी संबंधित चार पुजार्यांनाही बांगलादेश सरकारने अटक केली आहे. दरम्यान, हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ रविवार, १ डिसेंबर रोजी विशेष प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले आहे.
बांगलादेशमधील हिंदुंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि त्यांच्या सुरक्षेसाठी रविवारी जगभरातील इस्कॉन मंदिरांमध्ये विशेष प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले आहे. बांगलादेशच्या मुद्द्यावर इस्कॉनच्या प्रशासकीय समितीचे आयुक्त गौरांग दास म्हणाले, “आम्ही दर रविवारी कीर्तन आयोजित करतो. आज कीर्तनचे आयोजन बांगलादेशातील सर्व भाविक आणि हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी केले गेले. इस्कॉन आणि इस्कॉनचे प्रशासकीय मंडळ एकमेकांच्या संपर्कात आहेत. बांगलादेशमधील भारताचे उच्चायुक्त देखील सर्वांच्या संपर्कात आहेत आणि परिस्थिती सुधारण्यासाठी एकत्र काम देखील करत आहेत.”
इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष राधा रमण यांनी सांगितले की, बांगलादेशात आतापर्यंत चार इस्कॉनच्या पुजार्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांपैकी दोघे चिन्मय दास प्रभू यांना औषध देण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे. चिन्मय दास यांच्या सचिवालाही अटक करण्यात आली आहे. इस्कॉनची १५० देशांमध्ये ८५० मोठी मंदिरे आहेत, हजारांहून अधिक केंद्रे आहेत. बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करणारे इस्कॉनचे करोडो भक्त आहेत, असेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा..
“भाजपच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या निर्णयाला मनात किंतू- परंतु न ठेवता पाठींबा”
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘इंडी’ला दणका देत ‘आप’चा एकला चलोचा नारा
सिब्बल, पित्रोडांसोबत दिसलेला शुजा पुन्हा ईव्हीएम हॅक करण्याचा दावा करतोय!
कॅनडातील खलिस्तानींची नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी
हिंदूंवरील अत्याचाराविरोधात निदर्शने करणारे प्रमुख साधू चिन्मय प्रभू यांना ढाका पोलिसांच्या डिटेक्टीव्ह ब्रँचने सोमवारी (२५ नोव्हेंबर) ढाका विमानतळावर अटक केली. यानंतर ढाका, चितगाव आणि इतर भागांमध्ये चिन्मय प्रभू यांच्या अटकेविरोधात निदर्शने करण्यात आली. चिन्मय प्रभू यांनी शुक्रवार, २२ नोव्हेंबर रोजी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ रंगपूर येथे मोठ्या निषेध रॅलीला संबोधित केले होते. बांगलादेशातील पुंडरिक धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी हे बांगलादेशात भगवा ध्वज फडकावल्याबद्दल देशद्रोहाचा आरोप असलेल्या १८ जणांपैकी एक होते.