शिवाजी पार्कला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे कलादालन व्हावे!

शिवाजी पार्कला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे कलादालन व्हावे!

शिवाजी पार्क येथे असलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या कलादालनात पहिल्या मजल्यावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे कलादालन व्हावे, अशी आग्रही मागणी मुंबई महानगर पालिकेतील भाजपाने केली आहे. भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी व्हीडिओच्या माध्यमातून ही मागणी केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे.

ते म्हणतात की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्यांनी घराघरात पोहोचविला ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे १५ नोव्हेंबरला निधन झाले, पण शिवशाहीर जरी आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांनी केलेले विपुल लिखाण, साहित्य आणि ऐतिहासिक संशोधन हे पुढच्या पिढीला उपलब्ध करून देणे, त्यांचा जीवनपट भावी पिढ्यांसमोर आणणे ही त्यांना खरी आदरांजली ठरेल. भाजपाचा गटनेता म्हणून महापौरांना विनंती करतो की, संयुक्त महाराष्ट्र कलादालन शिवाजी पार्क, दादर येथील पहिल्या मजल्यावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे कलादालन उभे करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने धोरणात्मक निर्णय घ्यावा.

पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे नुकतेच वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे इतिहाससंशोधन, शिवचरित्राचा अभ्यास, प्रचार आणि प्रसार यात मोठी आणि न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

बाबासाहेबांनी १००व्या वर्षात पदार्पण केले होते. आपल्या या दीर्घायुष्यात त्यांनी ८ दशके शिवचरित्राला वाहिली. अखंड पायपीट करत दुर्ग किल्ल्यांना भेटी दिल्या, इतिहासाचे पुरावे जमविले, अफाट माहिती मिळविली आणि ती लोकांसमोर सादर केली. ‘जाणता राजा’सारख्या महानाट्याच्या माध्यमातून शिवचरित्राची भव्यता लोकांसमोर उभी केली.

 

हे ही वाचा:

अमृता फडणवीस हिंदीतून घेऊन आल्या ‘मणिके मागे हिथे’

गेहलोत सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी! ‘या’ मंत्र्यांनी घेतली शपथ

जरंडेश्वरप्रमाणेच जालना साखर कारखान्यात घोटाळा! अर्जुन खोतकरांचा हात

बापरे!! अ‍ॅमेझॉनवरून विकला जात होता गांजा

 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या या कार्यात अनेक तरुण तरुणींना जोडले. त्यांना शिवचरित्राच्या अभ्यासाची, इतिहाससंशोधनाची गोडी लावली.

Exit mobile version