दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू केशव महाराजने दाखवून दिले खरे हिंदुत्व

केरळच्या पद्मनाभ मंदिरात घेतले दर्शन

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू केशव महाराजने दाखवून दिले खरे हिंदुत्व

एकीकडे निवडणुका आल्या की तात्पुरते हिंदुत्व स्वीकारणारे राजकारणी सर्वत्र दिसू लागतात पण दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराज या क्रिकेटपटूने खरे हिंदुत्व काय याचे उदाहरण घालून दिले आहे.

सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आहे. यानिमित्ताने केशव महाराज हा तिरुवनंतपुरम, केरळच्या पद्मनाभस्वामी मंदिरात दर्शनासाठी गेला होता. त्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर टाकले. सोमवारी त्याने या देवळात जाऊन दर्शन घेतले. हे दर्शन घेताना धोतर परिधान करणे आवश्यक असल्यामुळे केशव महाराजने धोतर घालून दर्शन घेतले आणि नंतर त्याचे फोटो सोशल मीडिय़ावर टाकले. हे फोटो टाकतानाच त्याने नवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या. देशभरात सध्या नवरात्रौत्सवाची धूम सुरू आहे. त्या दरम्यान आफ्रिकेचा संघ भारतात आला आहे.

भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ टी-२० मालिका खेळणार असून त्यात तीन सामने असतील तर तेवढ्याच वनडे लढतीही हा संघ खेळणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत या लढती होतील. त्यातील सलामीची टी-२० लढत २८ सप्टेंबरला तिरुवनंतपुरम येथे होत आहे.

या दोन्ही संघांत केशव महाराज आहे. आगामी टी-२० वर्ल्डकपच्या निमित्ताने या मालिकेत चांगली कामगिरी करून आपला वरचष्मा राखण्याचा उद्देश दक्षिण आफ्रिका संघाने बाळगला आहे.

हे ही वाचा:

आठ राज्यांमध्ये NIA कडून PFI वर कारवाई

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण आता थेट पाहा

‘पीएफआय’ संबंधी आणखी एकाला नांदेडमधून घेतले ताब्यात

अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांची बस उलटतानाचा थरार सीसीटीव्हीत कैद

 

टेंबा बावुमा याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ या मालिकांना सामोरा जाणार आहे. या मालिकेत खेळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ थेट ऑस्ट्रेलियाला टी-२० वर्ल्डकपसाठी रवाना होईल.

भारतातील राजकारणात अनेक पक्ष हे निवडणुका जवळ आल्या की मंदिरांत फेऱ्या मारू लागतात, गळ्यात माळा, कपाळावर टीळा लावून आपणही कसे हिंदुत्ववादी आहोत, असे भासवू लागतात. पण केशव महाराजने दक्षिण आफ्रिकेत राहात असतानाही आपले हिंदुत्व जपले याचे आता सोशल मीडियावर कौतुक होते आहे.

Exit mobile version