चॅनेलवर ७२ हूरेंवरील कार्यक्रमात पॅनलिस्टची हाणामारी

इस्लामी स्कॉलर मानल्या जाणाऱ्या जमाईवर सुबुही खान यांनी उगारला हात

चॅनेलवर ७२ हूरेंवरील कार्यक्रमात पॅनलिस्टची हाणामारी

एरवी टीव्ही चॅनेलवर चर्चेच्या निमित्ताने एकमेकांमध्ये खडाजंगी होणे, एकमेकांवर शाब्दिक प्रहार होणे हे नित्याचेच असते. पण न्यूज १८ टीव्हीने ७२ हुरें या चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित चर्चेच्या कार्यक्रमात पॅनलिस्ट शोएब जमाईवर दुसरी पॅनलिस्ट सुबुही खान चांगलीच आक्रमक झाली. तिने त्या जमाई यांच्या अंगावर धाव घेत त्यांना मारण्यासाठी हात उगारला.

 

जमाई यांना नंतर हा कार्यक्रम सोडून जाण्यास सांगण्यात आले. या साऱ्या प्रकाराची एक व्हीडिओ क्लिप सध्या व्हायरल होत असून दोघांमध्ये एका विषयावरून बाचाबाची झाली आणि मग सुबुही खान उठल्या आणि त्यांनी जमाईच्या दिशेने धाव घेतली. तरीही दोघांमध्ये शाब्दिक चकमक होत होती. तेव्हा सुबुही खान यांनी तिथली खुर्ची उचलून जमाई यांच्यावर मारण्यासाठी उचलली. पण तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना आवरले. तरीही सुबुही खान ऐकायला तयार नव्हत्या. त्यांनी जमाई यांच्या दिशेने पुन्हा धाव घेतली आणि त्यांची कॉलरच पकडली. तेव्हा जमाई यांना कर्मचाऱ्यांनी सोडवले आणि जमाई यांना कार्यक्रमस्थळापासून बाहेर काढण्यात आले.

 

स्वतःला इस्लामी स्कॉलर मानणारे जमाई हे नेहमीच वादग्रस्त विधाने करतात. अमन चोप्रा यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. ७२ हूरें या चित्रपटावर आधारित असा हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या चित्रपटातून इस्लामी कट्टरतावादावर भाष्य करण्यात आले आहे. त्यातील ७२ हुरें अर्थात अप्सरांच्या संकल्पनेचा कसा वापर केला जातो, हे दाखविण्यात आले आहे.

हे ही वाचा:

शरद पवारांनी भाकरी फिरवली; कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेलांची वर्णी

धुळ्यात हिंदूंचा जनसागर लोटला!

कोल्हापुरात ४८ तासानंतर सगळे इंटरनेटवर ऍक्टिव्ह

आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्या चौघांच्या मुसक्या आवळल्या

या चर्चेदरम्यान जमाई यांनी काहीतरी भाष्य केले आहे असे वाटते. जे नंतर काढून टाकण्यात आले आहे. पण त्यामुळे सुबुही खान या संतापल्या. सुबुही खान या इस्लामी कट्टरतावादाच्या विरोधात नेहमी आक्रमक भूमिका मांडत असतात. पण त्यांनी जमाई यांची भूमिका पटली नाही. शिवाय, जमाई यांनी सुबुही खान यांच्या मुलाबद्दल काही भाष्य केलेले असल्यामुळे सुबुही खान अधिक वैतागल्या आणि त्यांनी जमाई यांच्या दिशेने धाव घेतली. चल निकल यहाँ से असे म्हणत त्या जमाईवर तुटून पडल्या. जमाई यांनीही खान यांना निकल यहाँ से असे म्हणायला सुरुवात केली. त्यावरून मग झटापट सुरू झाली. तेव्हा अमन चोप्रा आणि इतर कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. देश नही झुकने देंगे हा शो अमन चोप्रा चालवतात, त्यात ही खडाजंगी अगदी हमरीतुमरीवर आलेली पाहायला मिळाली.

Exit mobile version